कंधार प्रतिनीधी ःतालुक्यातील प्रसिद्ध आसणारे श्रीसंत नामदेव महाराज मठ संस्थांन उमरज च्या वतीने कोरोणासारख्या महामारी च्या काळात जिवाची पर्वा न करता सेवा देणारे कर्मचारी व गरीब गरजुंना संस्थानच्या वतीने आपली सामाजिक बांधिलकी जपत अन्नदाना सह जेवणाच्या डब्बेंची मदत करणारे संस्थानचे मठाधीपति एकनाथ गुरु नामदेव महाराज यांचा सोलापूर तरुण भारत च्या वतीने कोरोना योध्दा म्हणून सन्मान करण्यात आला .
दिनांक १६ आक्टोंबर रोजी श्री संत नामदेव महाराज मठ संस्थान श्री क्षेत्र उमरज येथे तरुण भारतचे कंधार तालुका प्रतीनीधी विनोद पाटिल तोरणे यांच्या हस्ते सन्मान पत्र व पुष्पहार घालुन मठाधीपती यांचा सन्मान करण्यात आला .
उमरज संस्थानचे मठाधीपती एकनाथ गुरु नामदेव महाराज यांच्या पुढाकारातुन संत नामदेव महाराज मंगल कार्यालय कंधार येथुन कोरोना सारख्या महामारीच्या लाॕकडाऊन च्या काळात वैद्यकिय ,महसुल,पोलीस विभागासह विविध क्षेञातील सेवा बजावणारे कर्मचारी व ईतर गोरगरीब गरजुंना अन्न धान्ये सह दररोज हजारो जेवणाचे डब्बे संस्थानच्या वाटप करण्यात आले विशेष म्हणजे या अशा भयानक परीस्थितीत आपल्या जीवाची पर्वा न करता मठाधीपती एकनाथ महाराज स्वतः उपस्थित राहुन त्यांनी गरजुंना मदतीचा हात दिला या कार्याची दख्खल घेत सोलापूर तरुण भारतच्या वतीने मठाधीपति यांना सन्मानित करण्यात आले .
या वेळी सह शिक्षक नवनाथ पाटिल तोरणे ,सेतु सुविधा केंद्र कंधार चे संचालक नदीम शेख,विश्वांभर भुते ,सदाशिव तोरणे ,राजेश भुत्ते ,गोविंद भुते ,तिरुपती भुत्ते तिरमुक भुत्ते ,राम भुते ,ज्ञानोबा तोरणे ,एकनाथ तोरणे , राजेंद्र तोरणे ,दत्ता तोरणे , कृष्णा तोरणे ,यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरींक व भक्त गण मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .