डॉ बाबासाहेबांनी स्त्री मुक्ती साठी स्त्री समतेसाठी हिंदू कोड बिल मांडले परंतू ते सनातनी राजकीय व्यक्तींनी पास होऊ दिले नाही त्यामुळे स्त्री सक्षमासाठी आपण विधेयक पास करून घेऊ शकलो नाही याचा निषेध व्यक्त करून मंत्री पदाचा राजीनामा दिला होता त्याच बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्री पुरुष समता व जातीअंतासाठी अशोका विजया दशमीच्या दिवशी नागपूर येथे लाखों शोषीतांना एकत्रितपणे गुंफुन बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती. तो धम्म चक्र प्रवर्तन दिन आज लोहा शहरातील जायकवाडी कर्मचारी वसाहत येथे साजरा करण्यात आला..
यावेळी महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पमाळ व पुष्प अर्पण करण्यात आले व जेष्ठ महिला आयुष्यमती सारजाबाई पांडुरंग पंडीत यांच्या हस्ते समतेच्या पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण सन्मानपूर्वक करण्यात आले.
https://youtube.com/shorts/oBda8pWW0hM?feature=share
उपस्थीतांनी सामुदायिक त्रिशरण पंचशील गृहण केले.. यावेळी ग्रामसेवक कांबळे, सोमसिंग नाईक आश्रम शाळेचे गुंडाळे घोडजकर, त्र्यंबक वाघमारे, आय.टी.आय.चे आर.पी.पंडीत, पोलीस बलवान कांबळे, तहसीलचे बारकुजी मोरे, व्यावसायिक विशाल गायसमुंद्रे, अमोल पंडीत,आशिष पंडीत, आयुष्यमती पंडीत, गौतमी मोरे, विशाखा दुधमल, प्रणीता रवींद्र पंडीत,सुमीत वाघमारे,चंद्रमणी निखाते आदी सह वसाहतीतील नागरीकांची उपस्थिती होती.. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन बारकुजी मोरे यांनी तर आभार प्रदर्शन विशाल गायसमुंद्रे यांनी मांडले..