वर्ल्ड अनेस्थेशिया डे साजरा करून डॉ.प्रल्हाद कोटकर व डॉ सचिन चांडोळकर यांची निवड

नांदेड: प्रतिनिधी

आय एम ए भवन येथे 16 ऑक्टोबर निमित्त वर्ल्ड अनेस्थेशिया डे साजरा करण्यात आला. यानिमित्त नवीन पदाधिकारी निवड करण्यात आली. यावेळी डॉक्टर सचिन चांडोळकर यांचे सेक्रेटरी सिटी ब्रांच नांदेड या पदी नियुक्ती करण्यात आली. तर अध्यक्ष डॉक्टर प्रल्हाद कोटकर यांची नियुक्ती झाली.

या कार्यक्रमास डॉक्टर मदन मोहन सिंग खालसा प्रिन्सिपल लॉ कॉलेज उपस्थित होते. तसेच डॉक्टर मनिष देशपांडे आय एम एफ प्रेसिडेंट व डॉक्टर नंदकुमार मुलमुले हे सुद्धा उपस्थित होते.

यावेळी पदग्रहण सोहळा व वर्ल्ड अनेस्थेशिया डे सुद्धा साजरा झाला. या निमित्त सर्व भूलतज्ञ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *