कंधार : प्रतिनिधी
15 ऑक्टोबर रोजी भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात आली. मोहम्मद रफिक सत्तार स ग्रंथपाल यांनी यावेळी सर्वप्रथम डॉ. कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले.
तसेच जितेंद्र ठेवरे ग्रंथालय प्रमुख, यांनी फुल अर्पण केले.
यावेळी रफिक यांनी उपस्थित वाचकांना मार्गदर्शन करताना डॉ.कलाम यांच्या विषयी थोडक्यात माहिती दिली व डॉ. कलाम यांनी लिखित उत्तम दर्जाची व वाचनीय असे महत्त्वाचे ग्रंथ ग्रंथालयात उपलब्ध असून याचा सर्वांनी पुरेपूर फायदा घ्यावा.
तसेच आपनांमध्ये वाचनीय आवड निर्माण करावी. असे सर्वांना आवाहन केले. यावेळी मोठ्या संख्येत वाचक उपस्थित होते.
उपस्थितांना चहापान करण्यात आले. कार्यक्रमासाठी मिलिंद महाराज, लता ढवळे, किसन भालेराव, माधव कांबळे यांनी परिश्रम घेतले.