कंधार : प्रतिनिधी
कंधार शहरासह तालुक्यातील रुग्णांना आरोग्यासाठी सर्व सोईने पुर्ण दवाखाना दसल्याने रुग्णाला अनेक अडचणीचा आमना करावा लागतो ही बाब लक्षात घेवून कंधार तालुक्यातील भुमिपत्र डॉ.ज्ञानेश्वर केंद्रे व डॉ. सौ. रोहिणी केंद्रे यांच्या दवाखान्याचे आज सोमवार दि 18 ऑक्टोबर रोजी ह.भ.प. श्री नामदेव महाराज दापकेकर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
यावेळी माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे, जि.प. सदस्या सौं प्रणिताताई देवरे चिखलीकर, माजी जिल्हा परिषद सदस्य पुरुषोत्तम भाऊ धोंडगे,
भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाबुराव केंद्रे, राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष बाबूरावजी केंद्रे, बालाजीराव झुंबाड मामा, देविदास महाराज गीते,
गंगाप्रसाद यन्नावार, चेतनभाऊ केंद्रे, मधुकरभाऊ डांगे, निलेश गौर, राजकुमार केकाटे, देवीदास केंद्रे,देवराव , मारोती मामा गायकवाड यांच्यासह कंधार व परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.