कंधार तालुक्यातील राऊतखेडा ते तेलूर रस्त्यावर जबरी चोरी;87 हजाराचा ऐवज लुटला

(प्रतिनिधी)-कंधार

तालुक्यातील राऊतखेडा ते तेलूर रस्त्यावर एक जबरी चोरी झाली असुन सुमारे 87 हजार रुपयाचा ऐवज लुटण्या -या दोन अज्ञात आरोपी . कंधार पालीसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे .

राऊतखेडा पुलाजवळ दोन अनोळखी माणसांनी त्यांच्या गाडी पाठीमागे मोटारसायकलवर आले
आणि त्यांच्या गाडीवर दगड मारून काचा
फोडल्या.डॉ. केदारनाथ माधवराव देशमुख हे आपली चार
चाकी गाडी क्रमांक एम. एच. 26 ए. 2147 या
गाडीने दि. 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6
वाजता नांदेडकडे येत असतांना तेलूर ते
राऊतखेडा पुलाजवळ दोन अनोळखी माणसांनी
त्यांच्या गाडी पाठीमागे मोटारसायकलवर आले
आणि त्यांच्या गाडीवर दगड मारून काचा
फोडल्या. सोबतच एकाने लोखंडी रॉडने
डॉक्टरास .च्या कपाळावर मारून दुखापत
केली. त्यांच्या गळ्यातील दोन तोळे सोन्याचे
लॉकेट आणि 12 हजार रुपये रोख रक्कम असा
87 हजार रुपयांचा ऐवज बळजबरीने लुटून
नेला. कंधार पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला
असून पोलीस उपनिरिक्षक इंद्राळे अधिक तपास
करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *