अहमदपूर ( प्रतिनिधी प्रा. भगवान आमलापुरे )
भारतीय राज्य घटनेने शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नानाविध पैलूचे दर्शन घडविणाऱ्या आणि साक्षेपी संपादक प्रा अशोककुमार दवणे यांनी संपादित आणि संकलित केलेल्या, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर महाकाव्यग्रंथाचे
प्रकाशन दि २० आक्टो २१ रोजी जिल्हाधिकारी लातूर यांच्या हस्ते, जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे. या महाकाव्यग्रंथात अहमदपूर येथील सेवानिवृत्त विस्तार अधिकारी तथा जेष्ठ साहित्यीक एन डी राठोड यांच्या क्रांतीसुर्य या कवितेचा समावेश आहे.तर प्रा ज्ञानेश्वर गायकवाड कुरुळेकर यांच्या बाबासाहेब या कवितेचा या महाकाव्यग्रंथात समावेश आहे.
या विषयी माहिती असी की प्रकाशनासाठी सिद्ध असणाऱ्या ह्या महाकाव्यग्रंथाचे प्रकाशन दि २० आक्टो २१ रोजी एकाच दिवशी ३६ जिल्ह्यामध्ये करावयाचे ठरले आहे. सदरील महामानव महाकाव्यग्रंथामध्ये तीन पिढयातील २०२१ कविंच्या २०२१ कवितांचे संपादन आणि संकलन करण्यात आले आहे.
सदरील महाकाव्यग्रंथ हा महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील सबंध भारतातील सर्वांत मोठा संपादित आणि संकलित महाकाव्यग्रंथ आहे.
या महाकाव्यग्रंथाचे प्रकाशन राज्यातील २५ जिल्हाधिकारी आणि ११ विद्यापीठांचे कुलगुरू यांच्या हस्ते,
त्यांच्या कार्यालयात आज दि २० आक्टो २१ रोजी संपन्न होणार आहे. केवळ अर्ध्या तासात हा प्रकाशनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील निवडक ०८ – १० मान्यवर कवी – लेखक प्रकाशन समारंभास उपस्थित राहणार आहेत.
सदरील मान्यवरांची नावे जिल्हाधिकारी कार्यालय लातूर यांना पत्राद्वारे कळविण्यात आले आहेत. प्रत्येक जिल्ह्यातील एका कविकडे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर महाकाव्यग्रंथाची एक प्रत प्रकाशन समारंभासाठी पाठविण्यात आली आहे.
गिनीज बुक आँफ वल्ड् रेकॉर्डमध्ये नोंद होणाऱ्या आणि मराठी साहित्य विश्वामध्ये मोलाची भर घालणाऱ्या महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर महाकाव्यग्रंथाचे निवडक साहित्यिक मंडळीच्या साक्षीने प्रकाशन करण्यात येणार आहे.
या प्रकाशन सोहळ्यासाठी सबंध लातूर जिल्ह्यातून पुढील मान्यवर साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. यात जेष्ठ साहित्यीक नामदेव राठोड, माजी प्राचार्य तुकाराम हरगिले, विद्रोही कवी राजेंद्र कांबळे, वाय डी वाघमारे, जनार्धन उमरगेकर, जना घुले, शोभा चव्हाण, वंदना बांगर, प्रा भगवान आमलापुरे आणि कवी विजय पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या महाकाव्यग्रंथात एन डी राठोड यांच्या क्रांतीसुर्य ह्या कवितेचा तर प्रा ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या बाबासाहेब या कवितेचा समावेश आहे.