बहाद्दरपूरा मन्याड नदीवरील पुलाला पीडब्ल्यूडीच्या उपचारांची गरज ..!; ५० वर्षे जुन्या व कमकुवत पुलाकडे प्रशासन व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

कंधारः


तालुक्यातील बहाद्दरपूरा येथील मन्याड नदीवरील ५० वर्षे जुन्या व कमकुवत पुलाकडे प्रशासन व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाल्यामुळे हा पूल भविष्यातील अपघाताच्या शृंघलेचा इशारा देत असाल्यामुळे ह्या कमकुवत व जखमी पुलाला पीडब्ल्यूडी म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या डागडुजी उपचाराची अत्यंत गरज आहे.


बहाद्दरपूरा येथील मन्याड नदीच्या पुलावरून अवजड वाहनांची रेलचेल मोठ्या प्रमाणात असून याच पुलावरून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५० हा नांदेड – उस्माननगर – कलंबर – बहाद्दरपूरा – फुलवळ मार्गे जांब जाणारा रस्ता व कंधार – मुखेड जाणारा नेहमीचा रस्ता असल्यामुळे या पुलावरून दुचाकी, चारचाकीसह राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी लागणाऱ्या मालाची वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांची मोठी वर्दळ वाढली आहे.


जवळपास ५० वर्षापूर्वी बांधलेल्या सदरच्या पुलावर मोठमोठे खड्डे पडले असून काही संरक्षण पाईपसुद्धा तुटले आहेत. सध्या मानार प्रकल्प हा पूर्ण क्षमतेने भरला असून धरणाच्या बॅक वॉटरमुळे पाणी पातळी पुलाबरोबर झाली आहे, तर पुलावरील स्टेट लाईटचे पथदिवे पूर्णतः बंद आहेत.

त्यामुळे रात्रीच्या वेळी पुलावरून जाताना समोरून मोठे वाहन येत असल्यास दुचाकीस्वाराला समोरचे काहीच दिसत नाही. त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून पुलावर पडलेले खड्डे, तुटलेले संरक्षण पाईप, बंद झालेले पथदिवे, पुलाच्या दोन्ही बाजूने काठोकाठ तुडुंब भरलेले पाणी या सर्व गोष्टींचा विचार करता… हा पूल धोक्याचा इशारा देत आहे.

त्यासाठी ह्या पुलाला वेळीच पीडब्ल्यूडी म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या डागडुजीच्या उपचाराची अत्यंत गरज आहे.


राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५० साठी मन्याड नदीवर नवीन पुलाची बांधणी कधी व कोठून होणार ? या प्रतिक्षेत वाहनधारक व प्रवासी असून या मार्गे प्रवास करणारे सर्वजण जीव मुठीत घेऊन जुन्या पुलावरुन प्रवास करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *