कंधार : प्रतिनिधी
कंधार SBI ही एकच राष्ट्रीयकृत बॕक असल्याने या बॕकेवर खुप ताण झाला आहे.पिक कर्ज व इतर कोणते ही कर्ज घेण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.तर या बॕकेत कर्जाचे काम हे दलाला शिवाय होत नसल्याने शेतकरी वैतागला आहे.
या संदर्भात लोकप्रतिनीधी मात्र कोणतीच भुमीका न घेता गप्प बसले आहेत.एरवी अतिवृष्टी झाली की शेतात जाऊन उड्या मारणाऱ्या फोटो सोशल मिडियावर व्हायरल केले जातात.
परंतु शेतकऱ्यांच्या पिक कर्जाचा प्रश्न मोठा असताना याकडे कोन्ही म्हणावे तसे लक्ष घालताना दिसत नसल्याने माजी सैनीकांनी SBIच्या शाखा व्यवस्थापकाची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
यावेळी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळणार आसल्याचे अश्वासन बॕकेचे मॕनेजर यांनी माजी सैनिकांना दिला आहे.
कंधार शहरात राष्ट्रीयकृत बॕकेचा विषय खुप मोठा झाला आहे.शहरात एकच बॕक असल्याने या बॕकेवर प्रचंड ताण पडला आहे.या बॕकेत मोठी गर्दी होत असल्याने कर्मचारी वर्गात ही रोष निर्माण होत असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.
कर्जा विषयी तर खुप मोठ गोंधळ निर्माण झाला आहे.गेल्या अनेक वर्षापासुन या बॕकेत मानधनावर दोन तिन कर्मचारी काम करत आहेत परंतु या कर्मचाऱ्यांनी अख्खी बॕकेचा कारभारच हातात घेतला आहे.कोणाला कर्ज द्यायचे आणी कोणाला नाही हे येथिल दलालच ठरवत असतात.या बाबती अनेक वृत्तपत्रातुन बातम्या येत आहेत परंतु राजकीय पुढाऱ्यांना जाग येत नाही.
सध्या कंधार तालुक्यात माजी सैनिक संघटना सध्या चांगले काम करत आहे.काही दिवसापुर्वीच नगर पालीकेतील कामगाराच्या संदर्भात आवाज उठवुन त्यांना न्याय मिळवुन दिला.तर अनेक विभागातील कामे निकाली लावण्याचे काम माजी सैनिक संघटनेच्या माध्यमातुन केली जात असल्याने काही शेतकऱ्यांनी माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी चुकुलवाड यांना बॕकेच्या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली असता दिनांक 18आॕक्टोबर रोजी माजी सैनिक संघटनेच्या शिष्टमंडळाने SBIच्या शाखा व्यवस्थापकाची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
यावेळी शाखा अधिकारी यांनी कोणता ही शेतकरी पिक कर्जा पासुन वंचित राहणार नसुन सर्वाना पिक कर्ज मिळणार असल्याचे अश्वासन दिले आसल्याची माहीती बालाजी चुकुलवाड यांनी दिली आहे.
आवाहन
शेतकऱ्यांनी पिक कर्जासाठी दलालाकडे जाऊ नये-बालाजी चुकलवाड
कंधार शहरात एकच राष्ट्रीयकृत बॕक असल्याने आजपर्यंत या बॕकेत मनमानी कारभार चालला हे नाकारता येणार नाही.सध्याचे शाखा व्यवस्थापक हे चांगले असल्याने सर्व शेतकऱ्यांना पिक कर्ज मंजुर करतील यात काही शंका नाही.शेतकऱ्यांनी या पुढे बॕकेतील कोणत्याही दलाला पैसे देण्याची गरज नाही.शेतकऱ्यांनी कंधार तालुका भ्रष्टाचारतुन मुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा. कामासाठी एक दोन दिवस उशीर झाला तर होऊ द्या परंतु कोणत्याही कर्मचारी व अधिकारी यांना पैसे देऊ नका.शेतकऱ्यांनी पिक कर्जासाठी बॕकेतील दलाला न भेटता सरळ शाखा व्वस्थापक यांना भेटावे जर कोन्ही पैसे मागत असतील तर मला फोन करावा असे अहवान बालाजी चुकुलवाड यांनी केले आहे.