मा.ना.अशोकराव चव्हाण सोबत शिवा संघटनेची बैठक संपन्न

नांदेड;

दि.२० आक्टोबर रोजी देगलूर -बिलोली विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूकी संदर्भात पालकमंत्री मा.ना.अशोकरराव चव्हाण व शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष मा.प्रा.मनोहरराव धोंडे यांच्यात शिवा संघटनेच्या ठरलेल्या निकषांप्रमाणे सर्व विषयांवर सर्वंकष सकारात्मक चर्चा झाली.

सर्व राजकीय पक्षांना शिवा संघटनेसोबत चर्चा करण्यासाठी दि.२२ आक्टोबर पर्यंत वेळ दिलेला आहे.त्यामुळे देगलूर -बिलोली विधानसभा मतदारसंघाचा निर्णय दि.२२ आक्टोबर ला दुपारी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केला जाईल.

या बैठकीत माजीमंत्री डी.पी.साव॑त, शिवा संघटनेचे राज्य उपाध्यक्ष वैजनाथराव तोनसुरे, जिल्हा संपर्कप्रमुख इंजि.अनिल माळगे, जिल्हाध्यक्ष संभाजी पाटील बुड्डे, विद्यार्थी आघाडी प्रमुख शिवकुमार मजगे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *