कोजागिरी पौर्णिमेनिमित्त गच्चीवरचे कविसंमेलन रंगले
नांदेड – कविता ही कवीच्या अंतरातील भावना असते. अस्वस्थ करणाऱ्या वेदना कविता जन्माला घालतात. त्या साथ सोबतही करतात. जीवनाच्या संघर्षमय पायवाटेवरून चालतांना अंधारातील दीपस्तंभ बनून येतात. प्रत्येक कविता काही ना काही संदेश देतात. कविता माणसाला जगण्याचा संदेश देतात, असे प्रतिपादन येथील जेष्ठ कवी शरदचंद्र हयातनगरकर यांनी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त घेण्यात आलेल्या कविसंमेलनात अध्यक्षपदावरून केले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ कवी अनुरत्न वाघमारे, उत्तम ढवळे, काव्यपौर्णिमेचे संकल्पक गंगाधर ढवळे, गणेश ढगे, प्रा. साहेबराव बेळे, संपादक कुलदीप सुर्यवंशी यांची उपस्थिती होती.
सप्तरंगी साहित्य मंडळाच्या जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने आयोजित कविसंमेलनात पत्रकारिता महाविद्यालयाचे प्राचार्य संदीप गोणारकर, यशवंत भवरे, मारोती कदम, नागोराव डोंगरे, पांडूरंग कोकुलवार, गंगाधर ढवळे, कैलास धुतराज, रणजीत गोणारकर, उल्हास काटे, प्रा. शिवाजी सूर्यवंशी, लक्ष्मण लिंगापुरे यांनी सहभाग घेतला.
प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष रणजित गोणारकर यांनी केले. काव्यपौर्णिमेचे संवादसूत्र शीघ्र कवी कैलास धुतराज यांनी हाती घेतले तर आभार उल्हास काटे यांनी मानले. कविसंमेलनाच्या यशस्वीतेसाठी वैशाली ढवळे, धुरपतबाई कांबळे, शोभा गोणारकर, अमोल गोणारकर, सचिन वाघमारे, कविता वाघमारे यांनी पुढाकार घेतला होता.