देगावचाळ येथे ६६ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा ; बुद्ध भीम गितांच्या संगीत रजनीने श्रोते मंत्रमुग्ध
नांदेड – शिक्षणातील मगासलेपणा दूर करुन माऱ्याच्या व मोक्याच्या जागा काबीज केल्याशिवाय समाज उन्नती शक्य नाही असे मत सुप्रसिद्ध गायक क्रांतिकुमार पंडित यांनी व्यक्त केले. यावेळी मनपाचे माजी उपायुक्त प्रकाश येवले, सामाजिक कार्यकर्ते सुभाष लोखंडे, सतीश हिंगोले, डी. एन. कांबळे, रवी पंडित, माधव कोल्हे यांची उपस्थिती होती.
शहरातील देगावचाळ येथील प्रज्ञा करुणा विहारात धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त गायक क्रांतीकुमार पंडित प्रस्तुत “क्रांतिसूर्य भीम संगीत रजनी” या आंबेडकरी जलशाचे आयोजन करण्यात आले होते. यात गायक सुनील हटकर, गायक रामभाऊ मस्के, गायिका सोनाली बळेगावकर , संगितकार चेतन चित्ते, तबला वादक प्रेमकुमार सरकटे, संगितकार आकाश गायकवाड, तबला वादक स्वप्नील धुळे, आदित्य डावरे यांनी सहभाग घेतला.
‘वो बात करो पैदा…. तुम अपनी जुबानो मे’, खूप शिकाव जीवाला जपावं… बोले भीमाला रमा, माझ्या भीमाच्या नावाचं… कुंकू लाविलं रमानं, ‘रक्त पिणारे सारे सारे; माड्या लोळवणारा…मी वादळ वारा’, ‘गौतमाचे चरणी फुल वाहिलेले… साकार झाले सप्न पाहिलेले’,
‘मला चीड येत नाही हाच माझा गुन्हा’, मुझे माफ करो महाराज मै जहर पचाके आज बडोदा छोड चला आदी गाण्यांनी श्रोते मंत्रमुग्ध झाले होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देगावचाळ रमामाता आंबेडकर महिला मंडळाच्या भिमाबाई हाटकर, शिल्पा लोखंडे, शोभाबाई गोडबोले, सविता नांदेडकर, रेखाबाई हिंगोले, चौत्राबाई चींतूरे, गिताबाई दिपके, गिताबाई खाडे, निर्मलाबाई पंडित, भागरताबाई थोरात, धम्माबाई नरवाडे, छायाबाई थोरात भिमाबाई हटकर, गयाबाई हटकर, लक्ष्मीबाई खाडे,
आशाबाई हटकर, सुमनबाई वाघमारे, गयाबाई नरवाडे, रमाबाई थोरात, पद्मीनबाई गोडबोले, जयश्रीबाई हटकर, पंचशीलाबाई हटकर, लक्ष्मीबाई खाडे, गोदावरीबाई लांडगे, रंजनाबाई वाळवंटे, रंजनाबाई राजभोज, वंदनाबाई नरवाडे, महामाया येवले, विमलबाई हटकर, नानाबाई, सोनाबाई राजभोज, निखाते ज्योतीबाई हिंगोले, गोदावरीबाई राजभोज यांनी परिश्रम घेतले.
भगवान येवले, विजय हिंगोले, नंदू खाडे, दयानंद नरवाडे, उत्तम हटकर, रावसाहेब बंडे, अनिल निखाते, सुरेश सावळे, गौतम येवले, विपिन हिंगोले, विजय थोरात, शुभम शेळके, वैभव गोडबोले, रितिक गोडबोले, सागर गोडबोले, संदीप लोणी यांनी सहकार्य केले.