साई सुभाषवरून आदेश आल्यास आगामी जि. प. निवडणूक लढविणार – प्राचार्य किशनराव डफडे

साई सुभाषवरून आदेश आल्यास आगामी जि. प. निवडणूक लढविणार – प्राचार्य डफडे

कंधार (प्रतिनिधी )

आगामी पंचायत समिती, जि.प. निवडणूक तोंडावर आली असून अनेक इच्छूक उमेदवार आपल्या सोईच्या मतदारसंघात गाठीभेटी घेत मतदारांना निवडणुकीला उभे राहणार असल्याचे सांगत असून फुलवळ जि.प. निवडणुकीसाठी साई सुभाष नांदेड येथील निवास्थानातून आदेश आल्यास मी निवडणूक लढविणार असल्याचे प्राचार्य किशनराव डफडे यांनी सांगितले.

जि.प.प.स.च्या निवडणुका काही महिन्यावर आले असताना विविध पक्षाची नेते मंडळी आपल्या सोईच्या मतदारसंघाचा शोध घेत आहेत. तर काहीजण आपण निवडलेल्या मतदारसंघातील गावोगावी भेटी देऊन मी जि.प. व प.स. निवडणूक लढविणार असे सांगत मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत.

त्यातच भाजपचे खा. प्रताप पाटील चिखलीकर यांचे विश्वासू प्राचार्य किशन डफडे फुलवळ जि.प. मतदारसंघातून लढविण्यास इच्छूक आहेत. नांदेड येथील साई सुभाष निवास्थान येथून जिल्ह्याचे खा. प्रताप पाटील चिखलीकर यांनी जि.प. निवडणूक लढविण्याची आदेश दिल्यास आपण फुलवळ मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्या वतीने निवडणूक लढविणार असल्याचे प्राचार्य किशनराव डफडे यांनी प्रतिनिधींशी बोलताना स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *