कोजागिरी पौर्णिमेनिमित्त क्षत्रीय महासंघा तर्फे नांदेड येथे घेण्यात आला आनंद महोत्सव

नांदेड ; प्रतिनिधी

मंगळवारी कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधून हिंदूकुलभूषण विर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या प्रांगणात अखिल भारतीय क्षत्रिय महासभाच्या महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा सौ सुषमा ठाकूर यांनी आयोजित केलेल्या कोजागिरी आनंद महोत्सवामध्ये विविध पुरस्कार तसेच मनोरंजक खेळ घेण्यात आले.

या कार्यक्रमाला ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांची प्रमुख उपस्थिती होती. सुरुवातीला सुषमा ठाकूर यांनी आपल्या प्रास्ताविकात कोजागिरी आनंद महोत्सव घेण्यामागचा उद्देश स्पष्ट केला. सुशीला लड्डूसिंग बायस व मनोरमा रघुवीरसिंग चंदेल यांच्या लग्नाची 51 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल दोन्ही जोडप्यांचा सत्कार करण्यात आला. तीन मुली असून देखील खचून न जाता त्यांचा योग्य तो सांभाळ केल्याबद्दल ज्योती दिलीपसिंह ठाकुर यांचा गौरव करण्यात आला.


राजपूत समाजातील सर्व महिला एकत्रित यावे या उद्देशाने विविध स्पर्धांचे आयोजन केले . महाराणा प्रताप सिंह यांच्या जीवनावर आधारित तसेच कोजागिरी पौर्णिमे बाबत घेण्यात आलेल्या प्रश्नमंजुषेमध्ये अनुपमा पवनसिंग चंदेल
यांना पहिला क्रमांक मिळाला.दांडिया, संगीत खुर्ची ,व इतर अनेक खेळाचा महिलांनी आनंद लुटला. सर्वोत्कृष्ट ठरलेल्या गीता राजेंद्रसिंग चंदेल यांना पारितोषिक देण्यात आले. पोलीस निरीक्षक घोरबांड यांनी मार्गदर्शन करताना महाराणा प्रतापसिंह यांच्या जीवनावर सखोल माहिती दिली. त्यांनी महिलांना साठी कांही महत्वाच्या सूचना केल्या. यात गर्दीच्या ठिकाणी जाताना आपले मौल्यवान वस्तू मोबाईल, दागिने सांभाळने
व होणाऱ्या दुर्घटनेपासून सावधान कसे राहता येईल याविषयी सविस्तर माहिती दिली.या कार्यक्रमास राजपूत समाजातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *