किवळा ता लोहा ; चक्रधर पाटील किवळेकर
भारतीय जनता पार्टी प्रदेश उपाध्यक्ष तथा नांदेड जिल्हा परिषद सदस्या सौ.प्रणिताताई देवरे – चिखलीकर यांच्या कडून किवळा तालुका लोहा येथील हनुमंत जीगळे यांच्या कुटुंबीयांचे आज दि. 22 ऑक्टोबर रोजी भेट देवून सांत्वन करण्यात आले.
किवळा तालुका लोहा येथील हनुमंत जीगळे यांचे दि.२० ऑगस्ट बुधवार रोजी
अपघाती निधन झाले होते. आज त्याच्या घरी सांत्वनासाठी भारतीय जनता पार्टी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य सौ . प्रणिता देवरे चिखलीकर यांनी कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले यावेळी लोहा पंचायत समितीचे सभापती आनंदराव पाटील शिंदे, माजी सभापती शंकरराव पाटील ढगे , तुकाराम पाटील, बालाजी पाटील , विठ्ठल किवळेकर, रंगराव पाटील लोंढे, दापशेडचे सरपंच वीरभद्र राजुरे, आदी उपस्थित होते.