कंधार/ लोहा प्रतिनिधी ; चक्रधर पाटील किवळेकर
मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई यांच्याकडून दिला जाणारा राज्यस्तरीय कुशल नेतृत्व जननायक लोकगौरव पुरस्कार,स्वातंत्र्य सैनानी मा.आमदार तथा संपादक भाई गुरुनाथराव कुरुडे यांच्या उपस्थित दै.उ.मराठवाडा या वृत्तपत्राचे पत्रकार तथा विद्यार्थीप्रिय संगणक शिक्षक मुरलीधर थोटे यांना शैक्षणिक,सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई यांच्याकडून ‘राज्यस्तरीय जननायक लोकगौरव’ २०२० चा पुरस्कार शैक्षणिक,सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल देण्यात आला. हा पूरस्कार मुंबई येथे 31 जानेवारी 2021 रोजी आयोजित करण्याचे प्रस्तावित झाले होते.
मात्र कोरोनाच्या महामारीमुळे व राज्यात लॉकडाऊन लागल्यामुळे काही महिने मुंबई थांबली होती.संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ऍड.कृष्णाजी जगदाळे व संयोजन समितीचे पदाधिकारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याने पुरस्कार सोहळा पुढे ढकलण्यात आला होता.
कोरोनाचे दिवस लक्षात घेता हा पुरस्कार विजेत्यांना घरपोच टपालाने पाठविण्याचे नियोजन समितीने केले होते. तो पुरस्कार मुंबईहुन टपालाने कंधार येथे सुरक्षित बॉक्समधून दि २१ ऑक्टोबर 2021 रोजी घरपोच मिळाला.त्या पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह,सन्मानपत्र,गोल्ड मेडल,मानाचा फेटा अशा पुरस्काराचे वितरण कंधार येथील बस्थानकाजवळील कुरुडे कॉम्प्लेक्स कॉमटेक कंप्युटर कंधार येथे भव्य दिव्य पुरस्काराचे वितरण माजी आमदार तथा संपादक व स्वातंत्र्य सैनानी भाई गुरुनाथराव कुरुडे यांच्या शुभ हस्ते पुरस्कार विजेता मुरलीधर थोटे याना प्रदान करण्यात आला.
या प्रसंगी कंधार मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष जमीर बेग,कलापुष्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष सदाशिव गायकवाड,निलेश गायकवाड,पत्रकार एस.पी.केंद्रे,संघपाल वाघमारे,सय्यद हबीब,बाबू किरतवाड शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील चाहते व कॉमटेक कंप्युटर सेंटरचे विद्यार्थी,विद्यार्थिनीं उपस्थित होते.
मुरलीधर थोटे यांनी गेल्या वीस वर्षापासून मन्याडखोऱ्याच्या डोंगराळ भागात पत्रकारितेच्या माध्यमातून उत्कृष्ट कार्य केले,तसेच त्यांनी ग्रामीण भागातील शिक्षणापासून कोसोदूर असलेल्या सर्व समाजातील विद्यार्थीनां संगणकाचे ज्ञान देऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी परिश्रम घेतले व आजही ते शैक्षणिक कार्याबरोबर सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रात अग्रस्थानी आहेत.
या सोहळ्याचे सुत्रसंचलन व आभार प्रा.सुभाष वाघमारे यांनी केलं तर सन्मान एका आदर्श व्यक्तीकडून प्रदान झाल्यामुळे पुरस्कार मानकरी मुरलीधर थोटे यांचं महाराष्ट्रातून सामाजिक,शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातून अभिनंदन केले जात आहे.