शेकाप आगामी स्थानिक स्वराज्य संस्था च्या निवडणुका स्वबळावर लढणार सौ. आशाताई शिंदे

नांदेड येथे शेकापचा भव्य कार्यकर्ता मेळावा संपन्न

नांदेड (प्रतिनिधी)


शेतकरी कामगार पक्षाचा भव्य कार्यकर्ता मेळावा नांदेड शहरातील आमदार शामसुंदर शिंदे यांच्या वसंत नगर येथील ऋषिका गार्डन येथे काल शुक्रवार दिनांक 22 रोजी मोठ्या उत्साहात पार पडला, या कार्यकर्ता मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून शेकापचे ज्येष्ठ नेते तथा अलिबाग-रायगड चे माजी आमदार भाई पंडित शेठ पाटील, औरंगाबाद विभागाचे चिटणीस काकासाहेब शिंदे यांची प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थिती होती,

यावेळी या कार्यकर्ता मेळाव्यास लोहा ,कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे, सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे ,जिल्हा नियोजन समिती सदस्य रावसाहेब पाटील शिंदे, जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील, खरेदी-विक्री संघाचे उपसभापती श्याम आण्णा पवार, युवा नेते रोहित पाटील शिंदे ,शेकापचे युवक जिल्हाध्यक्ष योगेश पाटील नंदनवनकर, राजीव पाटील शिंदे,अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष शेरू भाई यांची प्रमुख उपस्थिती होती. शेकापच्या कार्यकर्ता मेळाव्यास उपस्थितांना संबोधित करताना सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे म्हणाल्या की,लोहा कंधार मतदारसंघ हा एकेकाळी शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला होता,

लोहा-कंधार मतदार संघासह नांदेड जिल्ह्यातील सुजाण मायबाप जनतेचा शेतकरी कामगार पक्षावर दृढ विश्वास असल्याने जिल्ह्यातील लोहा-कंधार मतदार संघातील सर्वत्रिक विधानसभा निवडणुकीमध्ये शेकापचे उमेदवार म्हणून आमदार शामसुंदर शिंदे यांना तब्बल 72 हजार मतांच्या फरकाने विजयी केले असून मतदारसंघातील मायबाप जनतेचा आजही शेतकरी कामगार पक्षावर विश्वास असल्याचे सिद्ध केले आहे,

नांदेड जिल्ह्यातील आगामी होऊ घातलेल्या नगरपालिका ,नगरपंचायती, जिल्हा परिषद, पंचायत समिती, निवडणुका शेतकरी कामगार पक्ष स्वबळावर निवडणुका लढविणार असल्याचे यावेळी सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे यांनी शेकापच्या ज्येष्ठ नेत्या समोर जाहीर करून कार्यकर्त्यांना काम कामाला लागण्याचे आदेश दिले,

यावेळी माजी आमदार पंडित शेठ पाटील, काकासाहेब शिंदे यांनी शेतकरी कामगार पक्षाची आज पर्यंतच्या यशस्वी वाटचाली संदर्भात चर्चा करून जातीय शक्तींना रोखण्यासाठी आगामी काळात शेकापचे जास्तीच्या संख्येने विजयी उमेदवार स्थानिक जिल्ह्यातील स्वराज्य संस्था मध्ये जाण्यासाठी आमदार शामसुंदर शिंदे व सौ. आशाताई शिंदे यांनी प्रयत्न करावेत असे माजी आमदार पंडित शेठ पाटील यांनी बोलताना सांगितले ,

आमदार शामसुंदर शिंदे व सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे यांनी मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांमध्ये शेतकरी कामगार पक्ष बळकट करण्यासाठी विशेष लक्ष देण्याची विनंती माजी आमदार पंडित शेठ पाटील यांनी आमदार शिंदे यांच्याकडे यावेळी केली.

यावेळी उपस्थित हजारो शेकाप कार्यकर्त्यांशी बोलताना आमदार शामसुंदर शिंदे म्हणाले की मी लोहा, कंधार मतदार संघातील तळागाळातील, गोरगरीब ,शेतकरी, कष्टकरी, दीन, दलितांच्या सर्वांगीन विकासासाठी प्रयत्न करत असून. लोहा-कंधार मतदार संघातील मच्छीमारांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी व भोई मच्छीमारांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी आमदार शामसुंदर शिंदे यांनी बोलताना स्पष्ट केले.

शेकापच्या या भव्यदिव्य कार्यकर्ता मेळाव्यास लोहा, कंधार तालुक्या सह नांदेड जिल्ह्यातील शेकापचे हजारो कार्यकर्ते, सरपंच, उपसरपंच, शेकापचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *