महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर महाकाव्यग्रंथाचे प्रकाशन व सहभागी कविंचा शाहू राजे योगा ग्रूपतर्फे सत्कार.


अहमदपूर ( प्रतिनिधी प्रा. भगवान आमलापुरे )

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर महाकाव्यग्रंथाचे प्रकाशन व सहभागी स्थानिक कविंचा येथील छत्रपती शाहू राजे योगा ग्रूपतर्फे दि २२ आक्टो २१ रोजी सकाळी प्रियदर्शनी विद्यालयात सत्कार करण्यात आला.


अधिक माहिती असी की महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर महाकाव्यग्रंथाचे परवा दि २० आक्टो २१ रोजी जिल्ह्यधिकारी लातूर बी प्रथ्वीराज आणि उपजिल्हाधिकारी जीवन देसाई यांच्या हस्ते लातूर जिल्ह्यधिकारी कार्यालयात प्रकाशन करण्यात आले. या महाकाव्यग्रंथात २०२१ कविंच्या २०२१ कविता आहेत.यातील स्थानिक सहभागी कविंचा यथोचित सत्कार येथील छत्रपती शाहू राजे योगा ग्रूपतर्फे शाल आणि पुष्पहार देऊन करण्यात आला.

या सत्कारात जेष्ठ साहित्यीक एन डी राठोड, विद्रोही कवी राजेंद्र कांबळे, माजी प्राचार्य तुकाराम हरगिले, शाहीर सुभाष साबळे आणि प्रा भगवान आमलापुरे यांचा समावेश होता.


यावेळी एन डी राठोड यांनी प्रास्ताविकात पुरोगामी साहित्य परिषदेच्या गाढव मोर्चाची आठवण उपस्थितांना सांगितली. शिवाय पुरोगामी साहित्य परिषदेचे आजचे फलित, आउटपुट काय आहे. याचा गौरवपूर्ण पण थोडक्यात उल्लेख केला.विद्रोही कवी राजेंद्र कांबळे यांनी पण सहभागी कविंतर्फे प्रातिनिधीक स्वरूपात मनोगत व्यक्त केले.

माजी प्राचार्य तुकाराम हरगिले सर, विद्रोही कवी राजेंद्र कांबळे, एन डी राठोड आणि शाहीर सुभाष साबळे यांनी या वेळी एक एक कविता ऐकवली.कार्यक्रमास वाघमारे एस पी, कांबळे आर एस, माजी सरपंच कोकनगा विक्रमसिंह कच्छवे, दुगाने बि जी सर , एल डी कांबळे आणि नागपुर्णे सरांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश मंदाडे यांनी तर आभारप्रदर्शन मधुकरराव जोंधळे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *