माजी सैनिकांनी पुकारलेले अंदोलन पुढे ढकलले
कंधार ; मिर्झा जमिर बेग
लोहा तालुक्यातील जानापुरीचे भुमिपुत्र शहीद संभाजी कदम यांचे नाव लोहा येथिल उपजिल्हा रुग्णालयास १५ अॉगस्ट पर्यत देण्यात यावे अशी मागणी माजी सैनिक संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री व,पालकमंत्री यांना करण्यात आली होती.परतु पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी माजी सैनिकांच्या शिष्टमंडळाला विश्वासात घेऊन लवकरच हा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिल्याने संघटनेच्या वतीने पुकारलेले आंदोलन पुढे ढकलण्यात आले असल्याची माहीती जिल्हा अध्यक्ष बालाजी चुकलवाड यांनी दिली.
जानापुरी येथिल भुमिपुत्र शहीद संभाजी कदम यांना देशसेवेसाठी विरमरण आले.त्यांच्या स्मृती, विरता व बलीदानाची ओळख पुढील पिढीला राहावी म्हणून लोहा येथिल उपजिल्हा रुग्णालयास शहीद संभाजी कदम यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी माजी सैनिक संघटनेच्या वतीने करण्यात आली होती.तसेच प्रशासनास १५ अॉगस्ट पर्यत याचे अमलबजावणी करा अन्यथा अंदोलनाचे हत्यार संघटनेच्या वतीने उचलल्या जाणार असे निवेदन मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे ,गृहमंत्री देशमुख ,पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी देवून विनंती केली होती.
दरम्यान दि.१४ रोजी संबधित संघटनेचे शिष्टमंडळानी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांची भेट घेवून चर्चा करुन नाव देण्याबाबत आश्वासण दिल्याने तुर्तास माजी सैनिकांचे अंदोलन पुढे ढकलण्यात आले असल्याची माहीती कंधार
येथिल विश्राम गृह येथे माजी सैनिकांच्या झालेल्या बैठकिला जिल्हा अध्यक्ष बालाजी चुकलवाडयांनी दिली.यावेळी तालुका अध्यक्ष नवघरे आनंदराव,
पोचिराम वाघमारे , गोविंद सुर्यवंशी ,माणिकराव देवकत्ते ,बापुराव कल्याणकर आदीची उपस्थिती होती.