नांदेड दि. २३ – माळी समाज भूषण, महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनरावजी भुजबळ नांदेड येथे आले असता महाविकास आघाडी सरकारने ओबीसी आरक्षण ठेवण्याचा निर्णय घेतल्याने मंत्री छगनरावजी भुजबळ यांचा सत्कार सावता परिषद नांदेड च्या वतीने सी. टी. प्राईड हॉटेल येथे करण्यात आला.
यावेळी ओबीसी आरक्षणाच्या सामाजिक प्रश्नां सह शिक्षकांचे कॅम्प प्रणाली द्वारे पगारी करावी असे यावेळी निवेदन देवून आग्रह धरण्यात आला.
यावेळी सावता परीषद जिल्हाध्यक्ष गोरखनाथ राऊत,
जिल्हाउपाध्यक्ष माधव धोतरे, जिल्हा प्रवक्ता मारोती शितळे, समता परिषद हिंगोली जिल्हा अध्यक्ष नागोराव जामोदकर , विलास काळे ,सरपंच अशोक गडगिळे ,हरिहर धोत्रे,शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष किशन , माजी सैनिक जाबूतकर , समता परिषदेच्या जिल्हा अध्यक्षा रत्नमाला शिंदे तालुका अध्यक्ष कमळू ताई, प्रा. गणेश कमळू,
ज्ञानेश्वर गोरे, बालाजी बनसोडे, रघुनाथ आंबोरे, सुनील बालाजी शिंदे, आनंद आंबोरे, दीपक आंबोरे, आनंद काळे, गणेश माटे आदी सह महात्मा फुले समता परिषद व सावता परिषदेचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित होते.