कंधार ; प्रतिनिधी
ओबीसी आरक्षण लढयात सर्व शक्तीने कोर्ट आणि राज दरबारी खंबीर भूमिका घेतल्या बद्दल माळीसमाज भूषण राज्याचे ज्येष्ठ मंत्री छगनभुजबळ यांचा ,शिक्षक संघाच्यवतीने राज्य उपाध्यक्ष किशन घोलप यांनी सन्मान केला.
नांदेड येथील सिटी प्राईड हॉटेल मध्ये दि 23/10/21ला शिक्षकांचं वेतन नियमित सीएमपीप्रणालीने वेळेत व्हावे, तसेच शिक्षण खात्यातील सर्व रिक्त जागा तात्काळ भरण्यास सूचित करावे,शाळेचे सर्व वर्ग सुरू करावेत व इतर मागास आर्थिक महामंडळांच्य कर्ज प्रकरणे निकाली काढण्यात यावेत यावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी संबंधितांना आदेशित करण्यासाठी राज्य
शिक्षक संघ आणि समता परिषदेकडून विनंती करण्यात आली.
यावेळी शिक्षक संघाच्यावतीने मंत्री महोदयांच्या सन्मानासाठी राज्य शिक्षक संघाचे उपाध्यक्ष किशन घोलप,हिंगोली जिल्हा समता परिषद अधेक्ष डॉ नागोराव ,जांबुत्कर कार्यअधेक्ष विलास काळे,
महिला जिल्हा अध्येक्षा रत्नमाला शिंदे ताई. वसमत तालुकयातील महिला तालुका अधेक्षा कमळू ताई,प्रा.गणेश कमल्लू , जाधव साहेब , नरहरी वाघ साहेब. हरिहर धोत्रे सर, माधव धोत्रे, वाघमारे माजी सैनिक जांबुत्कर साहेब ..आदर्श सरपंच अशोक गड गिळे आदी समता सैनिक. शिक्षक उपस्थित होते.