मन्याड फाउंडेशनच्या वतिने माजी सैनिकांचा लोहा येथे सत्कार

मन्याड फाउंडेशनच्या वतिने माजी सैनिकांचा लोहा येथे सत्कार hप्रतिनिधी ;
    मण्याड फाऊंडेशनचे अध्यक्ष  यांच्या वतिने लोहा येथे सूर्योदय मन्याड फाउंडेशनच्या वतीने
कंधार लोहा मतदार संघातील तरुण वर्गासाठी भव्य नोकरी महोत्सव व माजी सैनिकांचा सत्कार समारंभ ठेवण्यात आला होता .

तसेच लोहा येथे संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आदर्श ग्रामपंचायत पाटोदाचे मा. सरपंच भास्कराव पेरे पाटील व मा श्री दत्ता काकडे (अध्यक्ष सरपंच परीषद महाराष्ट्र ) यांच्या हस्ते करण्यात आले .

              लोहा शहरात खूप  व एकनाथ दादा पवार मित्र मंडळ लोहा कंधारतर्फे मतदारसंघातील बेरोजगार युवकांना रोजगार मार्गदर्शन व भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन आज करण्यात आले होते . नोकरी महोत्सव मध्ये 350 युवकांची आज  जॉइनिंग झाली.
       सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनोहर भोसीकर होते .तर प्रमुख पाहुणे  भास्कराव पेरे पाटील व मा श्री दत्ता काकडे होते .
एकनाथ दादा पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले .

ग्रामपंचायत पाटोदाचे मा. सरपंच भास्कराव पेरे पाटील यांनी आदर्श गाव या विषयावर मनोगत सादर केले .तसेच  श्री दत्ता काकडे (अध्यक्ष सरपंच परीषद महाराष्ट्र ) यांनी सरपंच याना काम करताना काय काय अडचणी येतात त्या सांगितल्या .

  पंचायत समिती सदस्य उत्तम चव्हाण , मा. जि. परिषद सदस्य परदेशी , भोजुचीवाडी चे सरपंच सतीश देवक्तते सर  ,माजी सैनिक संघटनेचे जिल्हाद्यक्ष बालाजी चुकलवाड साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त  केले

     कार्यक्रमाला उपस्थित  सोनू संगेवार, पंकज परिहार, मुरंबी सरपंच राम पाटील पवार ,हरी शिंदे, भास्करराव पाटील, माजी सैनिक संघटना जिल्हा अध्यक्ष बालाजी चुकलवाड, कंधार लोहा तालुक्यातील पत्रकार बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .तसेच कंधार व लोहा तालुक्यातील  सरपंच,उपसरपंच , पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य , मतदार संघातील तरुण वर्ग ,माजी सैनिक व मतदारसंघातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *