नांदेड; प्रतिनिधी
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतात कोरोना लसीकरणाचा शंभर कोटीचा टप्पा पूर्ण झाल्यामुळे नांदेड येथील गुरुगोविंदसिंगजी स्मारक शासकीय रुग्णालयातील लसीकरण केंद्रात धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या तर्फे देण्यात येत असलेल्या मास्क, सॅनिटायझर, पाण्याची बॉटल व बिस्किट वाटपाच्या 221 व्या दिवशी लस घेणाऱ्या नागरिकांना गुलाबपुष्प व लाडू देऊन आनंद साजरा केला.
गेल्या आठ महिन्यापासून अखंडितपणे सेवा ही संघटन उपक्रम भाजपा महानगर नांदेडच्या वतीने खा. प्रतापराव पाटील चिखलीकर व महानगराध्यक्ष प्रवीण साले यांच्या मार्गदर्शनाखाली संयोजक धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांच्यातर्फे कोविड लस घेणाऱ्या नागरिकांना बिस्किट, मिनरल वाटर, मास्क,सॅनिटायझरचे वाटप करण्यात येते .
रविवारी लायन्स क्लब नांदेड सेंट्रलचे सचिव अरुणकुमार काबरा, भाजपा नवा मोंढा मंडळ सरचिटणीस कामाजी सरोदे, भाजपा महानगर उपाध्यक्ष बागडया यादव भाजपा दिव्यांग आघाडी चे महानगराध्यक्ष प्रशांत पळसकर यांनी
करोनाची लस घेणा-या नागरिकांना नियमित साहित्यासोबत गुलाबपुष्प व लाडू वाटप केले.
यामुळे लस घेणाऱ्या नागरिकांना सुखद धक्का बसला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.आय. भोसीकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. शिर्शिकर निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.एच. के. साखरे यांच्या नेतृत्वाखाली या लसीकरण केंद्रावर महत्त्वाची भूमिका बजावणारे रुग्णालयातील डॉ जयश्री वाघ. डॉ. देशमुख. डॉ बालाजी गायकवाड यांच्यासह सर्व डॉक्टर्स, परिचारिका, डाटा ऑपरेटर तसेच कर्मचाऱ्यांचा भाजपा व लायन्स क्लब नांदेड सेंट्रल तर्फे सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इंजि. शुभम वानोळकर,मनोज अग्रवाल,रोहीत अग्रवाल. पवन सरोदे यांनी परिक्षम घेतले. 221 दिवस एकही दिवस न चुकता लस घेणाऱ्या नागरिकांना सेवा देत असलेल्या दिलीप ठाकूर व त्यांच्या टीमचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.