कंधार ; प्रतिनिधी
दि. 29 ऑक्टोबर 2021 रोजी श्री शिवाजी मोफत एज्यूकेशन सोसायटी संचालित श्री शिवाजी विधी महाविद्यालय कंधार, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व उच्च व तंत्र शिक्षण विभाग शासन निर्णय दि. 13-10-2021 अन्वये महाविद्यालयात दि. 28-10-2021 रोजी लसिकरण शिबीराचे आयोजन आले आहे.
त्यासाठी महाविद्यालयातील ज्या विद्यार्थ्यांनी कोरोना लसीकरणाचा कोणता ही डोस घेतलेला नसेल, त्याच व्यक्ती लस घेऊ शकतो तसेच आपल्या कुटूंबातील व्यक्तीनी लस घेतली नसेल त्यांनी देखील महाविद्यालयात आयोजित लसीकरणात येऊन लसीकरण करून घ्यावे.
लसीकरणास जेवण करून याने आधार कार्ड किंवा पॅन कार्ड सोबत आणावे, असे आवाहन प्राचार्य यांनी केले.