कंधार : वस्तू खरेदी केल्याने नुकसानीला सामोरे जावे लागते. शेतीची अवजारे असोत की बी-बियाणे असोत खराब वस्तूमुळे आपल्याला फटका बसतो. हे टाळण्यासाठी ग्राहक संरक्षण कायदा तयार करण्यात आला आहे. ज्या कोणाची फसवणूक झाली त्यांनी जिल्हा तक्रार निवारण केंद्रात तक्रार केल्यास त्यांना नुकसान भरपाई मिळू शकते. ग्राहक संरक्षण कायद्यात अशी तरतूद असल्याचे दिवाणी न्यायाधीश आर. ए. ए. खतीब यांनी सांगितले.
भारत की आजादी का आम्रत महोत्सव
निमित्त तालुक्यातील उस्मानगर येथे विधी सेवा समिती व अभिवक्ता संघाच्यावतीने आपले हक्क अधिकार व कायदे विषयक शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अभिवक्ता संघाचे अध्यक्ष अँड दिगंबर गायकवाड, सरकारी वकील अँड. महेश कागणे, सचिव अँड. अनिल डांगे, अँड. दिलीप कुरुडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना न्या. खतीब मॅडम म्हणाल्या की, महिलांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होतात. कायद्याचं ज्ञान नसल्याने आमच्या भगिनी मुकाट्याने ते सहन करतात. असे अत्याचार रोखण्यासाठी महिला संरक्षण कायदा आहे. या कायद्याच्या माध्यमातून महिलांना न्याय दिला जातो असे स्पष्ट करून त्यांनी दिवाणी व फौजदारी दाव्यांची माहिती दिली.
यावेळी अँड. वर्षाराणी जोंधळे, अँड पदमवार मँडम, अँड. सागर डोंगरजकर, पोलीस उपनिरीक्षक थोरे, सरपंच श्रीमती गयाबाई घोरबांड, ग्रामसेवक शिंदे मँडम, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी व ग्रामस्थ मोठ्यासंख्येने उपस्थित होते.