कंधार; प्रतिनिधी
राज्य परिवहन मंडळातील कर्मचायाचे वेतन दिपावली पूर्वी अदा करण्यात यावी,या सह अन्य मागण्यासाठी स.प.महामातील सर्व संघटनेच्या संयुक्त कृती समितीच्या वतिने आज गुरुवार दि 28 ऑक्टोबर रोजी आगारातील एसटी चालक वाहक व कर्मचार्यांनी आगार समोर आमरण उपोषण सुरु केले आहे.
कंधार आगाराच्या कार्यालय येथे संयुक्त कृती समितीच्या द्वारे आमरण उपोषण करण्यात येत आहे. यावेळी आगार प्रमुखांना निवेदन देण्यात आले
या निवेदनावर चव्हाण बी एन, पी . आर, गीते , आर जे पाटील, अभंगे व्ही बी, जी के सोनकांबळे, एम.जी. तेलंग, व्ही एस ढवळे, आर आर केंद्रे आदींच्या या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.
सदरील उपोषणाला शिवसेना माजी नगरसेवक गणेश कुंटेवार ,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजकुमार केकाटे यांनी भेट देऊन पाठिंबा दिला आहे.