उस्मानाबाद – क्रांती पंडित कांबळे ही विलासराव देशमुख कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लातूर या महाविद्यालयातून बीएससी ऍग्री बायोटेक्नॉलॉजी (कृषी जैवतंत्रज्ञान) या शाखेतून सलग चार वर्षे प्रथम आलेली आहे. 2019- 2020 मध्ये ती विद्यापीठातून प्रथम आल्यामुळे तिची सुवर्णपदकासाठी निवड झाली होती.
क्रांती कांबळेला मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे पार पडलेल्या तेविसाव्या पदवीदान समारंभात दिनांक 25 ऑक्टोबर 2021 रोजी पार पडलेल्या कार्यक्रमात अध्यक्ष, प्रमुख पाहुणे व कुलगुरू यांचे हस्ते सुवर्ण पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नामदार दादाजी भुसे (कृषी तथा माजी सैनिक कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य व प्रतिकूलगुरू वनाम कृषी विद्यापीठ, परभणी) व प्रमुख पाहुणे डॉक्टर चारुदत्त मायी (माजी कुलगुरू परभणी तथा माजी अध्यक्ष कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळ, नवी दिल्ली) यांच्या हस्ते गौरवान्वीत करण्यात आले.
यावेळी विद्यापीठाचे सर्व निमंत्रित माजी कुलगुरू, विद्यापीठ कार्यकारणी परिषदेचे सर्व सन्माननीय सदस्य, विद्यापीठाच्या विद्वत परिषदेचे सर्व सदस्य, प्राध्यापक गण, स्नातक ,सर्व निमंत्रित, पत्रकार मित्र, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.
क्रांती कांबळे ही सध्या लातूर येथे त्याच कॉलेजमध्ये एम एस सी प्रथम वर्ष पूर्ण करीत आहे. तिचे नातेवाईक, मित्र परिवार व अनेक सामाजिक संस्था या सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.