कंधार ;-( डॉ.माधवराव कुद्रे )
समस्त मानव जातीला गिळंकृत करु पाहणाऱ्या कोरोना म्हणजेच कोवीड-१९ या वैश्विक महामारीच्या विरोधात प्रत्येक जण आप आपल्या परिने लढा देत असून बहादरपुरा-कंधार येथील डॉ.प्रदीपसिंह राजपूत यांचे अख्खे कुटुंबच कोरोनाच्या लढाईत कोरोना योद्धा म्हणून लढत असल्याने कंधार परिसरात सध्या हा कुतूहलाचा विषय बनला आहे.
डॉ.प्रदीपसिंह राजपूत हे होमिओपॅथिक तज्ञ असल्याने कोरोना साथरोगामध्ये कंधार तालुक्यातील महसूल प्रशासन, आपत्तीव्यवस्थापन प्रशासन, पोलीस प्रशासन व महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य सेवे सोबत पहिल्या दिवसापासून खांद्याला खांदा लावून लढत आहेत,काही दिवसापुर्वि मन्याड नदीच्या पैलतीरावर एक कोरोना सदृश्य, संशयित व्यक्ती रस्त्यावर पडून असल्याची वार्ता माजी जि.प.सदस्य पुरुषोत्तम धोंडगे यांना कळाली असता त्यांनी स्थानिक ग्रामीण रुग्णालयाला पाचारण केले परंतु त्यांनी सांगितले आमच्या कडे पी.पी.ई किट नसल्याने आम्ही येवू शकत नाही, यावर पुरुषोत्तम धोंडगे यांनी थेट पालकमंत्री ना.अशोकराव चव्हाण यांना फोन करून सांगितले, पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांना हा प्रकार सांगितला, जिल्हाधिकारी यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांना तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिले, डॉ. बालाजी शिंदे यांनी कंधार चे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ढवळे यांना आदेश दिले की,नेमका काय प्रकार आहे पहा,यावर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. साहेबराव ढवळे यांनी डॉ.राजपूत यांना फोनवरून सांगितले की, डॉ. राजपूत साहेब तुमच्या हाँस्पिटल च्या काही किलोमीटर अंतरावर एक कोरोना सदृश्य संशयित व्यक्ती असल्याचे सांगण्यात आले आहे, कृपया प्रत्यक्ष जावून पहा व नेमका काय प्रकार आहे ते सांगा तो पर्यंत आम्ही अँम्बुलंस पाठवितो,हा फोन काँल ऐकल्यावर डॉ. राजपूत आपल्या डॉ. रोहण राजपूत या मुलाला व आरोग्य सेवेत कर्तव्यावर असलेल्या श्रीमती.व्हि.व्हि.चंदेल राजपूत, पत्नीला ही सोबत घेवून ३ मिनिटात घटनास्थळी पोहचले,रात्रीची वेळ असल्याने चिक्कार अंधार होता, बघ्यांची गर्दी होती परंतु बोलावल्यावर ही मदतीसाठी कोणीच पुढे येत नव्हते डॉ. राजपूत यांनी कोणीतरी पुढे येवून मदत करा असे म्हटलें असता मदतीला पुढे तर कोणीच आले नाही, उलट बघे लोकं म्हणाले डॉक्टर साहेब तुम्हाला मरायचे आहे का….?कशाला पुढे जाताय परत जा…!
डॉ.राजपूत एव्हढ्यावर थांबले नाहीत, आपल्या कारचे हेडलाइट चालू करुन रुग्णाला शोधत-शोधत जवळ गेले आपल्या जीवाची पर्वा न करता डॉ. राजपूत आपल्या पत्नी व डॉक्टर असलेल्या मुला,मुलीसोबत त्या रुग्णाच्या जवळ सुरक्षित दहा फुटांपर्यंत जावून विचारणा केली असता एक महिला रस्त्याच्या कडेला बसलेली होती,डॉ. राजपूत यांनी त्या महिलेला विचारले की,माय तुम्ही कुठल्या आहात,तुम्हाला काय झालं….? त्या वर ती महिला रुग्ण म्हणाली मी,अहमदपूर कडील आहे,मला आजार, बीमारी कोणतीही नाही साहेब, मला कोरोना झाल्याच्या संशयाने नातेवाईकांनी,माझ्या पोटच्या मुलीने हाकलून दिले,मी या रस्त्याने उन्हात पायी चालत आले व चक्कर येवून येथे पडले होते, दोन मुलांनी मला रस्त्याच्या कडेला बसविले व ते निघून गेले,हे ऐकून डॉ. राजपूत कुटुंबिय म्हणाले माय तुम्ही भिऊ नका,घाबरु नका,सरकारी दवाखान्याची गाडी येत आहे, तुम्हाला मोठ्या दवाखान्यात घेवून जातो, तुमचा ईलाज करु,तुम्हाला सलाईन, इंजेक्शन देवू आमच्या सोबत चला,डॉ. राजपूत यांच्या बोलण्याला ती रूग्ण महिला चांगला प्रतिसाद देत होती, हे विशेष..!
कोरोना तपासणी साठी व पुढील उपचारासाठी त्या महिलेला पाठविण्यात आल्याचे डॉ. राजपूत यांनी महसूल, पोलीस व आरोग्य सेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळावरुनच कळविले (या सर्व घटनाक्रमाचे व्हिडीओ चित्रीकरण व सुरवातीपासून चे व त्या महिलेला पुढील उपचारासाठी पाठविल्या नंतर चे सर्व फोनकाँल रेकॉर्ड डॉ. राजपूत यांच्या कडे उपलब्ध आहेत) या ह्रदयद्रावक घटनेतील अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे अशी की,ती महिला कोरोना ची होती की,नव्हती यापेक्षा डॉ. राजपूत व त्यांच्या कुंटूंबियांनी दाखवलेल्या धाडसामुळे त्या माय माऊली चे प्राण मात्र नक्कीच वाचले,तीला वेळेवर उपचार मिळाला नसता तर ती महिला रात्रभर तेथेच पडून राहीली असती व डिहायड्रेशन ने जागेवरच मरुन गेली असती. हा पुर्ण घटनाक्रम डॉ. राजपूत यांनी अनुक्रमे माजी जि.प.सदस्य प्रा.पुरुषोत्तम धोंडगे,तहसीलदार सखाराम मांडवगडे,तालुका आरोग्य अधिकारी डाँ. साहेबराव ढवळे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर यांना घटनास्थळावरुनच सांगितला असता उपरोक्त सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शाबासकी देत ” डॉक्टर राजपूत युअर ए रियल कोरोना योद्धा ” म्हणत डॉ. राजपूत व त्यांच्या अख्ख्या कुटूंबाची प्रशंसा केली.
कोवीड-१९ साथरोग दरम्यान दररोज आपल्या ठरलेल्या आरोग्य विषयक कामकाजाच्या शेड्यूल प्रमाणे डॉ. राजपूत यांचे पुर्ण कुटुंब कोरोनाच्या साथरोगामध्ये आपले योगदान देण्यासाठी सकाळीच् घराबाहेर पडते,विशेष म्हणजे
डॉ. राजपूत हे एम.सी.एच.मुंबई च्या वतिने एप्रिल २०२० बँच चे प्रशिक्षित कोरोना वारिअर्स योद्धा असून ते होमिओपॅथिक तज्ञ असल्याने डॉ. राजपूत यांनी सर्व प्रथम बहादरपुरा ग्रामपंचायत चे सरपंच, उपसरपंच, सदस्य,सर्व ग्रामपंचायत चे कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, आशा, आंगणवाडी कर्मचारी आदी सर्वांना आयुष मंत्रालय भारत सरकारने आदेशित केलेले कोरोना रोगप्रतिबंधात्मक व रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारे अर्सेनिकम अल्बम-३० हे होमिओपॅथिक औषध मोफत दिले, डॉ. राजपूत यांनी एव्हढ्यावर न थांबता कंधार चे उपविभागीय अधिकारी पांडुरंग बोरगांवकर, तहसीलदार सखाराम मांडवगडे, नायब तहसीलदार विजय चव्हाण,श्री. ताडेवाड, पोलीस निरीक्षक श्री. जाधव,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एस.पी.ढवळे,पेशकार श्रीमती रागीनी,कंधार डॉक्टर्स असोशिएशनचे अध्यक्ष डॉ. भगवानराव जाधव,यांच्या सह महसूल अधिकारी व कर्मचारी, विविध सामाजिक संघटना या सर्वांना आपल्या वतीने मोफत औषधे दिली असून ग्रामपंचायत बहादरपुरा, ग्रामपंचायत फुलवळ यांच्या वतीने पुर्ण गावकऱ्यांना डॉ. राजपूत यांनी अर्सेनिकम अल्बम-३० हे औषध वैद्यकीय मार्गदर्शनाखाली घरपोच दिले आहे.
कंधार डॉक्टर्स असोसिएशन चे डॉ.राजपूत हे सचिव असल्याने संबंधित आरोग्य व महसूल प्रशासना सोबत वैद्यकीय समन्वयक म्हणून कोरोना साथरोगामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत,ग्रामपंचायत च्या माईकवरून गावकऱ्यांना कोरोनाविषयक मार्गदर्शन, व्हि.डी.ओ.द्वारे कोरोना पासून प्रतिबंधात्मक उपाययोजना,वारंवार साबणाने हाथ धुण्याचे आवाहन, मास्क वापरणे,गरज नसतांना घराच्या बाहेर पडूच नये या बाबत बँनर लावून जनजागृती करणेअसे समाजहिताचे कार्य करत आहेत, त्यांचे चिरंजीव डॉ. रोहणसिंह राजपूत व त्यांची कन्या डॉ. रोशनीसिंह राजपूत हे पहिल्या दिवसापासून कोरोना योद्धा म्हणून त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढत आहेत तर डॉ. राजपूत यांच्या सुविद्य पत्नी सौ. विद्या चंदेल राजपूत ह्या प्रा.आ.केंद्र. पानशेवडीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. फरहानाज शेख मँडम यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य सेवेमध्ये अविरत आरोग्य सेवा करत आहेत, डॉ. राजपूत यांच्या अख्ख्या कुटुंबाच्या कोरोना कार्याची दखल विविध सामाजिक संघटनांनी घेतली असून महाराष्ट्र राज्य पातळीवर डॉ. राजपूत कुटुंबाचा ” कोरोना योद्धा ” म्हणून महाराष्ट्र राजपूत क्षत्रिय संघाच्या वतीने सन्मानित करण्यात येणार आहे.