गावाकडचा पोळा

शिवास्त्र : गावाकडचा पोळा 


पृथ्वीतलावर फक्त माणूस हाच उत्सवप्रिय सामाजिक प्राणी आहे. सोहळे केवळ सजविण्यासाठी नाही तर आपआपसातील वाद संपुष्टात आणून निखळ प्रगतीचा आणि उज्वल भवितव्याचा विचार करण्यासाठी साजरे व्हावेत… ही कृषीकुलोत्पन्न सिंधू संस्कृतीची शिकवण.! 


आपलं जगणं सुखकर करणाऱ्या व्यक्तिंविषयी सारेच कृतज्ञता व्यक्त करतात पण उपयुक्त पशूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी खास दिवस नेमण्याची कृषीसंस्कृती पाळण्याची उदारता शेतकरीच दाखवतो, या अभिमानास्पद परंपरेतील महत्त्वाचा दिवस : बैल पोळा..!! 
तुप-पुरणपोळी, सार-भात, कढी-भजे हा पोळ्याचा खास मेनू. धकाधकीच्या जीवनात वेळ काढून पोळ्याला शेतावर जाणं हल्ली शक्य होत नाही. माझे वडील मा. न्या. भि. तु. नरवाडे पाटील साहेब (दादासाहेब) एक बाब नेहमी सांगतात की, “निसर्गापासून दुर गेल्यामुळे मानवाच्या आरोग्याच्या समस्या अन् व्यवस्थेपुढील प्रश्नात वाढ झाली आहे, त्यामुळे निसर्गपर्यटन केले पाहिजे.”


बळीपुजन, बैल-पोळा, वेळ-अमावस्या, नागपंचमी, इ. सण निसर्गपर्यटनाला चालना देण्यासाठीच तर कृषीकुलवंशजांनी सुरू केले नसतील.? अनावश्यक, अंधश्रध्दामुलक व अनिष्ठ रुढी परंपरा त्यागायला हव्यात पण वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगून पूर्वजांनी सुरू केलेल्या भविष्यलक्षी प्रथा सोडून आपण नको त्या गोष्टींचे अनुकरण तर करत नाहीत ना.? या बाबीचाही साकल्याने विचार करावा. कृषीप्रधान देशात जगाचा पोशिंदा असणारा शेतकरीच देशोधडीला लागलाय, आणि आपण भारत कृषीप्रधान देश म्हणून स्वतःची स्वहस्ते धोपटून घेण्यात धन्यता मानतो.

आधुनिक विज्ञानयुगात कृषीमालाला उत्पादन खर्चावर आधारित दर देण्यात इथली व्यवस्था अपयशी ठरली हे वास्तव नाकारण्यात काय अर्थ आहे.?  
युगसाक्षी लाईव्हच्या चोखंदळ वाचकांना, असंख्य चाहत्यांना, जाहिरातदारांना पोळ्याच्या मनपुर्वक सदिच्छा..!!  

पारख गुणांची


इंजि. शिवाजीराजे सुनिता भिमराव पाटील (नांदेड) 

   मास्टर कोच – जवाहरलाल नेहरू लिडरशिप इंन्स्टिट्युट (MC – JNLI) नवी दिल्ली 

    राष्ट्रीय अध्यक्ष – वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद   [email protected]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *