महिलांना शिक्षित करण्यासाठी, सावित्रींनी अपमान पचविला ; कंधारी आग्याबोंड


दि. 31/10/2021

महिलांना शिक्षित करण्यासाठी, सावित्रींनी अपमान पचविला! विद्यार्थिनी असता पुज्य सावित्री, सौ. होताच क्षणी का विसर पडला?

पतिश्वराचा खरा आदर्श घेवून, शिक्षण देण्याचा श्रीगणेशा केला! चौकटीच्या आत बंदिस्त नारीला, शिक्षण घेण्याचा सन्मार्ग दावला!

श्रीदेवी संग सावित्री पुजल्याने, दोघांचाही आशीर्वाद नारीला! नारीला शिक्षण खुले करणाऱ्या, सावित्री फुलेंना का विसरल्या?

शिक्षणाने सुशिक्षीत झालेल्या नारीने, अंधश्रध्दाळूचा पर्याय निवडला? व्रत-वैकल्यात धन्यता मानणाऱ्या, नारीला सावित्रीबाई नाही कळाल्या?

गोपाळसुत दत्तात्रय एमेकर गुरुजी, क्रांतिभुवन बहाद्दरपुरा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *