नांदेड -महाराष्ट्रात एस टी महामंडळाच्या कामगारांनी विलीनीकरण ची मागणी करत सुरू केलेल्या आंदोलनाला खा प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून भारतीय जनता पक्षाचा सक्रिय पाठींबा असल्याचे जाहीर केले यावेळी भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष प्रवीण साले यांनी सुद्धा समर्थनार्थ मार्गदर्शन केले
महाराष्टात एस टी महामंडळाच्या कामगारांनी प्रशासकीय यंत्रणेमध्ये एस टी महामंडळाचे विलीनीकरण करावे यासाठी कामगार संघटनांनी पुकारलेल्या काम बंद आंदोलनाला स्थानिक पातळीवर अधिकारी दबावतंत्राचा वापर करून आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे
त्यामुळे काही कामगार संघटनांनी नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या कडे माहिती दिली होती त्यामुळे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे स्वतः नांदेड एस टी आगार येथे जाऊन आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी झाले ,उपस्थित कामगारांना संबंधित करताना खासदारांनी आंदोलनामध्ये भाजपा सदैव तुमच्या सोबत असल्याचे आश्वासन देत अधिकार्यांनी बळजबरीने आंदोलक कामगारांना त्रास देऊ नका म्हणून सुनावले,
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रविण साले यांनी आंदोलकांनी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करावे भाजपा प्रत्येक वेळी तूमच्यासाठी रस्त्यावर उतरून सहकार्य करणार असल्याचे जाहीर केले,
यावेळी भाजपचे मनपा विरोधी पक्षनेते दिपकसिंह रावत, अनिलसिंह हजारी, शितल खांडील, प्रभू कपाटे, धिरज स्वामी, सचिन रावका, मारोती वाघ, कुणाल गजभारे, संदिप कर्हाळे, राज यादव, रुपेश व्यास, अमोल कुल्थिया, रोहित पाटील कांचन हुकुमसिंह गहलोत यांचे सोबत एस टी कामगार संघटनेचे एन डी पवार, रुपेश पुयड, एम डी गौस, एस बी ठाकुर, आतीश तोटावार, सूर्यकांत चापोळे, मंगेश कांबळे, रंजीतसिंग शिलेदार , पद्मश्रीताई राजे, कल्पनाताई यांच्या सह असंख्य आंदोलक उपस्थित होते.