प्रिय प्रवासी देवतेस…
नतमस्तक होवून दीपावलीच्या जडअंतःकरणाने खिन्न होवून सदिच्छा देतांना प्रशासन राग नसून रुसवा ठेवून देत आहे.
माझी सुरुवात १९४८ साली स्वतंत्र भारतात मुंबई सेंट्रल येथे उद्घाटन होवून झाली.पुर्वी वाहनाव्दारे सार्वजनिक प्रवासी वाहतूक १९३२ आरंभ झाली.नंतर बाॅम्बे स्टेट रोड ट्रान्सपोर्ट काॅप्रोरेशन (BMRTC) स्थापना झाली.
पहिल्यांदा १ जुन १९४८ रोजी पुणे ते अहमदनगर पहिली फेरी करुन माझ्या कार्याला खरी सुरुवात झाली.
माझे मालक म्हणजे महाराष्ट्र शासन आहे.सेवाचार्यांची एकुण संख्या १ लक्ष ७ हजार आहे.एकुण १२ विभागात माझे कार्य चालते आहे. ४३७९ कोटीची उलाढाल दरवर्षीच होते, निव्वळ उत्पन्न ७० कोटीचे. “प्रवाशांच्या सेवेसाठी” हे ब्रीद उराशी बाळगून मी व माझा परिवार अखंडीत प्रवाशांच्या सेवेसाठी काम करते आहे.
माझे पालक असलेले महाराष्ट्र शासन आहे,पण वर्तमानात माझ्या सेवाचार्यांना सध्या सत्याग्रहाचा अवलंब करावा लागतो आहे.ही माझ्यासाठी अवमानाची गोष्ट आहे.सर्वांना पगारवाढ होत आहे,पण माझ्या सेवाचार्यांना झगडावे लागत आहे.
ही यंदाची दिवाळी आनंदाची जाण्यासाठी जंगजंग पछाडावे लागते आहे.कांही सेवाचार्य आत्महत्या करण्याच्या पवित्र्यात आहेत.नको रे बाबा शासनाचा निषेध हा हक्काने करा…पण आत्महत्या अस्त्र हे न्याय मागण्यासाठी योग्य नव्हेच!
मी लालपरी नावाने ओळखली जाते, दररोज असंख्य प्रवाशांची नेआन करते…त्यांना कोणतीही इजा होवू नये याची दखल घेतली जाते.माझ्यातून करत असलेला प्रवास सुरक्षित असते..माझ्या सेवाचार्यांचा परिवार वाऱ्यावर हे विसंगत वाटते! सध्या नाईलाजास्तव सर्व एस.टी.कर्मचाऱ्यांना संपाचे अस्त्र काढुन झगडावे लागत आहे.ऐन दिवाळीत प्रवाश्यांची गैरसोय होत असतांना आम्हाला आतिव दु:ख होत आहे.
पण आम्हाला कुटुंब वाऱ्यावर सोडून चालणार कसे.सत्ताधाऱ्यांकडून कुचंबना होत आहे. विरोधी पक्ष आमच्या बाजुने असला तरी हा प्रश्न आजचा नसुन पुर्वी पासून रेंगाळत आहे.आम्हाला काम जास्त दाम कमी हे कुठेतरी थांबले पाहिजे? बारा विभागात आमच्या सर्व सेवाचार्यांचे काम अप्रतिम चालत असतांना झगडावे लागत आहे.
आपल्या राज्याचे परिवहन मंत्री आदरणीय अनिल रावजी परब साहेब आमचे पालक आहेत.त्यांनी शासन अन् आमच्यात समझोता करुन कायम तोडगा काढुन आमची दिवाळी आनंदी करावी.आमच्या सेवाचार्यांच्या अधिश्वरीस व कर्मचारी भगीनींना दीपावलीची ओवाळणी भाऊ म्हणुन भाऊबीजेस द्यावी ही विनंती करते आहे.
आमचे कार्यालयीन सेवाचार्य सोडल्यास बाकीच्यांना जीव मुठीत धरून सेवा करावी लागते.आम्हाला नोकरी संपल्या नंतर पेंन्शन नाही.अंगात ताकद असतांना काम करुन घेतात पण सेवानिवृत्त होताच वाऱ्यावर हे थांबले पाहिजे.आमचे महामंडळ शासकिय सेवेत आणले पाहिजे त्यासाठी मी लालपरी जाहीर विनंती करत आहे.
प्रवाशांची गैरसोय होवू नये म्हणून आजवर आम्ही गुपचुप आपले कर्तव्य पार पाडले…आमच्या बायका पोराचा सांभाळ करत कुटुंब आनंदी ठेवण्याची जबाबदारी पार पाडावी लागते.तुटपुंज्या पगारात कसे चालणार? कांही सेवाचार्यांनी आत्महत्या केली.त्याच्या परिवाराची जबाबदारी कुणावर? त्यांच्या शिवाय कुटुंबाचा चरित्रार्थ कसा चालणार? असे प्रश्न मला पडला आहे,
गेली चार-पाच दिवसा पासून प्रवाश्यांची होणारी गैरसोय याची जबाबदारी कुणाची?खाजगी वाहनांनी अधिच वैतागून गेलो अन् त्यात ही परेशानी….भाकर खाणे अंगी लागत नाही?सरकारला कळकळीची विनंती की,हा संप लवकरात लवकर मिटावा म्हणुन शासनाने उच्च स्तरावर प्रयत्न करुन हे प्रकरण मिटून टाकून साह्य करावे.आमच्या चालक बंधुचे कौतुक करावे तेव्हढे कमीच आहे.प्रवाश्यांचा १००% भरोसा असल्यामुळेच आम्हास त्यांचा गर्व वाटतो!आज अनेकजण आमची कीव करत आहेत पण सरकारला दया येत नाही ही खेदाची गोष्ट आहे.
मला कंधारच्या सुंदर अक्षर कार्यशाळेचे सुलेखनकार गोपाळसुत दत्तात्रय एमेकर गुरुजींनी मला बोलके करुन माझी व्यथा आपल्या पर्यंत बोलके शल्य पोहंचविले त्या बद्दल मी ऋणी आहे.माझ्याशी संवाद साधतांना त्यांनी माझ्या एस.टी महामंडळात कार्यरत असलेल्या सेवाचार्यांना दीपावलीच्या हर्षानंदी सदिच्छा देतांना हा चिघळलेला प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा हा मनोदय व्यक्त केला.
गोपाळसुत
दत्तात्रय एमेकर गुरुजी,
क्रांतिभुवन बहाद्दरपुरा.
9860809931