शिक्षण विभाग जिल्हा परिषद नांदेड येथील कार्यालयातून प्रदीर्घ काळ सेवा केलेले कार्यालयीन अधिक्षक सिद्धार्थ ओव्हळ सेवानिवृत

नांदेड: प्रतिनिधी

शिक्षण विभाग जिल्हा परिषद नांदेड येथील कार्यालयातून प्रदीर्घ काळ सेवा केलेले कार्यालयीन अधिक्षक अत्यंत सुंदर हस्ताक्षराचे धनी तथा व्यासंगी व अभ्यासू व्यक्तीमत्व मा. सिद्धार्थ ओव्हळ साहेब नियत वयोमानाप्रमाणे 31 ऑक्टोबर 2021 रोजी सेवानिवृत झाले आहेत. त्यानिमित्ताने त्यांचा निरोप समारंभ मा. सौ. सविता बिरगे मॅडम शिक्षणाधिकारी (प्रा)यांच्या अध्यक्षतेखाली व मा.श्री प्रशांत दिग्रसकर साहेब शिक्षणाधिकारी (मा.) , मा. श्री डॉ. दत्तात्र्य मठपती उपशिक्षाधिकारी (प्रा) , मा.श्री माधवराव सलगर उपशिक्षणाधिकारी (मा.) , मा. श्री बळीराम येरपुलवार (अक्षिक्षक वर्ग 2 ), मा. श्री बंडु आमदुरकर प्रभारी उपशिक्षाधिकारी ( प्रा. व मा ) जि.प. कर्मचारी नेते मा. श्री बाबुराव पुजरवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत शिक्षण विभागाच्या कार्यालयात काल सांयकाळी संपन्न झाला.

त्याप्रसंगी महाराष्ट्र राज्य पदवीधर प्रा. शिक्षक व केंद्रप्रमुख सभेच्या वतीने मा. श्री सिद्धार्थ ओव्हळ सरांचा शाल, श्रीफळ व पुष्पहाराने यथोचित सत्कार करून त्यांना भावी निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

त्याप्रसंगीच्या छायाचित्रात श्री शंकरराव इंगळे, राज्यउपाध्यक्ष म.रा. पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभा तथा संचालक , सहकारी शिक्षण पतपेढी नांदेड , श्रीमती मांदळे मॅडम शिक्षण विस्तार अधिकारी जि प. नांदेड , श्री चंद्रकांत दामेकर राज्य शिक्षक नेते तथा संचालक सहकारी शिक्षण पतपेढी नांदेड व श्री डॉ. हेमंत कार्ले आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *