कर्जाला कंटाळून गोगदरी येथिल शेतकऱ्याची गळफास घेवून आत्महत्या…!गेल्या 25 वर्षापासुन शिवसेनेचा सच्चा कार्यकर्ता म्हणून होती मयत उत्तम कल्याणकर यांची ओळख

कंधार ; प्रतिनिधी

कंधार तालुक्यातील गोगदरी येथिल उत्तम आयनाथ कल्याणकर वय (५५) या शेतकर्यांनी सतनच्या नापिकी व बॅकेच्या कर्जामुळे आज दि. १ नोव्हेबर रोज सोमवार सकाळी शेतात गळफास घेवून आत्महत्या केली. दिलेल्या फिर्यादी वरून कंधार पोलीसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

गेल्या अनेक वर्षापासून सततच्या नापिकीमुळे व पावसाच्या लहरीपणा मुळे शेतकर्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे त्यामुळे शेतकरी कर्तबाजारी होवून हतबल होत आहे. कर्ज चुकते होत नसल्याने शेवटी आपली जिवनयात्रा संपवत आहे.

कंधार तालुक्यातील गोगदरी येथिल 55 वर्षीय शेतकर्याने सततच्या नापिकीमुळे व झालेल्या कर्जबाजारीपणामुळे आज सोमवार दि १ ‘ नोव्हेंबर रोजी गळफास घेऊन आपली जिवनयात्रा संपवली आहे. मयत उत्तम कल्याणकर यांचे कंधार येथिल ग्रामिण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी,3 मुली व 1 मुलगा असा परिवार आहे.

उत्तम आयनाथ कल्याणकर वय (५५) हे गेल्या 25 वर्षा पासुन भिवसैनिक म्हणून गोगदरी येथे काम करतो. अनेक वेळा अनेक पक्षाकडून ऑफर येऊनही मयत उत्तम आयनाथ कल्याणकर यांनी शिवसेना सोडली नाही. शिवसेनेच्या कार्यकर्त्यावर महाराष्ट्रात शिवसेना व मित्र पक्षाचे सरकार असल्याने सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे.

रघुनाथ कल्याणकर यांच्या फिर्यादीवरून कंधार पोलीसात भादवी कलम 174 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक केंद्रे हे करत आहेत.

पत्नी सुशिलाबाई कल्याणकर यांची SBI बॅके विरुध्द पोलीसात तक्रार

माझे पतीचे स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा कंधार येथे बँक खाते आहे. शासनाचे विविध योजनेचे पैसे स्टेट बँके मार्फत आम्हाला मिळतात.

माझे पतीच्या नावाने स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा कंधार येथे असलेले कर्ज शासनाकडुन माफ झाले आहे. माझे पती शेता मध्ये नापिकीमुळे नविन कर्ज घेणेकामी बँकेत सुमारे ३ महिण्या पासुन चकरा मारीत होते. पण बँकेचे मॅनेजर, फिल्ड ऑफिसर व इतर कर्मचा-यांनी माझे नव-यास अपमानाची वागणुक देवून बँकेने सतत त्रास दिला व आत्महत्या करण्यास परावृत्त केले.

तरी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा कंधार बँकेच्या कर्मचा-या विरुध्द कार्यवाही करुन मला न्याय दयावा.

सुशिलाबाई उत्तम कल्याणकर रा. गोगदरी ता. कंधार जि.नांदेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *