श्री संत गाडगे महाराज विद्यालयाच्या ओमकार पवार चे नीट परीक्षेत यश

लोहा ;

लोहा येथील श्री संत गाडगे महाराज उच्च माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी ओमकार दत्ता पवार रा.सायाळ ता.लोहा यांनी केंद्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या नीट 2021 या परीक्षेत 606 गुण घेऊन एम.बी.बी.एस.च्या प्रवेशास पात्र ठरला आहे.


तरी त्याच्या या यशाबद्दल श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधार चे अध्यक्ष प्रा.डॉ.पुरुषोत्तमराव धोंडगे साहेब हे स्वतः उपस्थित राहून ओमकार पवार यांचा निवासस्थानी सायाळ येथे जाऊन संस्थेच्या वतीने सत्कार करून त्यास पुढील शिक्षणासाठी सदिच्छा दिल्या. ओमकार पवार यांनी जिद्द ,मेहनत आणि कष्टाने अभ्यास करून मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे कौतुक केले.विद्यार्थ्यांचे पालक श्री दत्ता पवार, काका माऊली पाटील पवार यांचाही सत्कार करण्यात आला.


यावेळी श्री संत गाडगे महाराज विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.एस.बोधगिरे उपमुख्याध्यापक श्री अनिल जाधव विज्ञान विभागाचे प्रा.गोपाळ तेलंग , प्रा.प्रदीप गरुडकर, प्रा.संदीप नागपूरने कार्यालय अधीक्षक विश्वंभर पाटील श्री हरी पाटील शिंदे प्रा.गजानन जामगे प्रा.बबन पवार प्रा.एकनाथ जाधव श्री संभाजी लुंगारे ,श्री श्याम पाटील, शिवाजी पवार व विनोद महाबळे आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *