शिवराज दादा धोंडगे यांनी केली कंधार लोहा तालुक्यातील आत्महत्या ग्रस्त कुटूंबासोबत अनोखी दिवाळी साजरी

नांदेड ; प्रतिनिधी

लोहा तहसील कार्यालयात आत्महत्या केलेले भीमराव चंपती शिरसाट उमरा ता. लोहा येथिल रहिवाशी यांच्या कुटुंबीयांना भेटून राष्ट्रवादी काँग्रेस युवा नेते शिवराज दादा धोंडगे यांनी आज शुक्रवार दि 5 नोव्हेबर रोजी दिवाळी साजरी केली . तसेच दिवाळी भेट म्हणून त्या कुंटूंबाला ११००० रू आर्थिक मदत केली. कु संध्या भीमराव शिरसाट या मुलीकडून औक्षण करून घेत अनोखी दिवाळी साजरी करून आपले सामाजिक दायित्व सिद्ध केले .

यावेळी शिवराज दादाचे मित्र शर्माजी , सरकारी वकील राजूरकर साहेब , ब्रह्माजी शिरसाठ पाटील , माधवराव पाटील , उस्मान शेख , शाहीर गौतम कांबळे यांच्यासह त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते .

तसेच आज कलंबर बू येथे आत्महत्या केलेले विठ्ल सरर्गळे यांच्या कुटुंबीयांना भेटून शिवराज दादा धोंडगे यानी यांनी ११००० रू आर्थिक मदत केली . यावेळी सतीश शर्माजी, सरकारी वकील राजूरकर साहेब , उत्तमराव कोंडलेवाडे , दिलीप कोंडळवडे , विश्वनाथ अरुटले यांच्यासह त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते .

दुपारच्या सञात दगडसांगवी येथेही आत्महत्या केलेले विठ्ल सरर्गळे यांच्या कुटुंबीयांना भेटून शिवराज दादा धोंडगे यांनी ११००० रू आर्थिक मदत केली .

यावेळी सतीश शर्माजी, सरकारी वकील रमेशराजूरकर साहेब , प्रहलाद फाजगे , उपसरपंच श्रीधर फाजगे , मनोहर फाजगे , संग्राम पाटील , मधुकर फाजगे , गौतम पवार , कामाजी पाटील यांच्यासह त्यांचे कुटुंबीय आणि गावकरी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *