माणसाने सदैव मरणाचे स्मरण ठेवून जगावे – ह.भ.प.माऊली महाराज खडकवाडीकर


मुखेड- जो जन्माला आला आहे त्याला एक ना एक दिवस मरावेच लागणार आहे.त्या पूर्वी आपण चांगले कर्म केले पाहिजे. ज्या देवाने व आई-वडिलांनी आपणास हे जग दाखवले, मायेने वाढविले त्यांना विसरता कामा नये. सुखाची खरी प्राप्ती करून घ्यायची असेल तर देवाला आपल्याशी केले पाहिजे. त्याशिवाय खरे सुख प्राप्त होत नाही. बाकी ठिकाणावरून मिळणारे सुख हे क्षणिक आहे. सुखासिन झाल्यावर देवाला व मरणाला विसरून चालत नाही म्हणून माणसाने सदैव मरणाचे स्मरण ठेवून जगावे असे प्रतिपादन भागवताचार्य ह.भ.प. माऊली महाराज खडकवाडीकर यांनी ‘आपुला तो एक देव करुनी घ्यावा’ या अभंगावरती मौजे देवकरा ता.अहमदपूर जि. लातूर येथे वै. दत्तात्रय भाऊराव बदने यांच्या चतुर्थ पुण्यस्मरण दिनानिमित्त बोलताना केले.


पहिल्या दिवशीच्या किर्तन प्रसंगी परळी येथील ह.भ.प. बंडोपंत महाराज ढाकणे यांनी ‘ बाप करी जोडी’ या अभंगावरती कीर्तन करून बाप लेकरासाठी सर्वस्व अर्पण करत असल्याचे सांगितले. खरे तर शास्त्राने, साहित्यिकांनी व अन्य सर्वांनीच आईला महत्त्वाचे स्थान दिले परंतु आईपेक्षा बाप कुठेही कमी नाही. यासाठी त्यांनी दत्तात्रय बदने यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी घेतलेल्या कष्टाची आठवण करून दिली.

राजा दशरथ, वसुदेव,विठ्ठलपंत या व यासारख्या बापांचा त्याग त्यांनी सप्रमाण विशद केल. या दोन दिवसीय किर्तन महोत्सवासाठी गायक म्हणून उद्धव महाराज भोजनकवाडीकर, माधव महाराज तांदळवाडीकर, कैलास महाराज मुरकुटे, अंकुश महाराज मोळवणकर,मनोहर महाराज मुंडे डाबीकर, बालाजी गूट्टे देवकरा, बालाजी गूट्टे दगडवाडी, लक्ष्मण नागरगोजे गंगाखेड,प्रल्हाद महाराज फड देवकरा, लहु महाराज मुरकुटे देवकरा यांची तर वादक म्हणून पंडित दहिफळे कोळवाडी व नागनाथ भिसे गंगाखेड यांची उपस्थिती होती.


या पुण्यस्मरण दिनानिमित्त उपस्थितांचे स्वागत संयोजक प्रा. डॉ. रामकृष्ण दत्तात्रय बदने, भागवत दत्तात्रय बदने, प्रा.योगीराज दत्तात्रय बदने यांनी केले.किर्तनानंतर सर्वच भाविक भक्तांनी भोजन प्रसादाचा लाभ घेतला. दरवर्षी आयोजित या पुण्य स्मरण दिना निमित्त देवकरा व पंचक्रोशीतील लोकांना श्रवणाची पर्वणीच लाभत आहे.


सदरील कार्यक्रमास अहमदपूर चाकूरचे विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील, मुखेड येथील माजी आमदार कर्मवीर किशनराव राठोड, सौ. कांताबाई किशनराव राठोड, भाजपाचे प्रदेश प्रवक्ता गणेश दादा हाके, कृषी उत्पन्न बाजार समिती अंबाजोगाईचे संचालक किशनराव घुले काका, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस दीलीपराव देशमुख, भाजपा किसान मोर्चा नांदेड जिल्हाध्यक्ष बाबुरावजी केंद्रे उमरगेकर, भाजपा लातूर जिल्हा सरचिटणीस त्रंबकअबा गूट्टे, खंडाळी जि.प. गटाचे माधव जाधव,

ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. भूषणकुमार जोरगुलवार,प्रा. डॉ. बालाजी किशनराव घुले, प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. मनोहरराव घुले, वंजारी युवा संघटनेचे नेते धनराज भाऊ गूट्टे,किनगावचे सरपंच किशोर बापू मुंडे, मुखेड येथील संस्थेचे सदस्य मुख्या. गोविंद पवार, पत्रकार यशवंत बोडके, परळी येथील राष्ट्रवादीचे नेते लक्ष्मण मुरकुटे, डॉ. रामदास गूट्टे, भाजपा नेते हेमंत गूट्टे,

प्रसिद्ध कवी राजसाहेब कदम,प्रसिद्ध कवी नागनाथ बडे, मुख्या.दिनकर मुंडे,प्रा. डॉ. विठ्ठल दहिफळे,प्रा. बाबासाहेब फड, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक किशोर फड,वैजनाथ मुंडे,प्रा.अशोक फड, संवाद तज्ञ उद्धव बापू फड व अन्य श्रोते मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *