दैनिक सत्यप्रभा दिवाळी अंकाचा ६ नोव्हेबर रोजी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकाशन सोहळा

नांदेड

दैनिक सत्यप्रभा दिवाळी अंक २०२१ चा प्रकाशन सोहळा
सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्हा पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते
शनिवार, दि.०६ नोव्हेंबर २०२१ रोजी सायंकाळी ६.०० वाजता  डॉ. शंकरराव चव्हाण स्मृती संग्रहालय, आयटीएम कॉलेज परिसर, नांदेड येथे संपन्न होणार आहे.

प्रकाशन सोहळा कार्यक्रमासाठी अध्यक्ष मा.ना. अशोकराव चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री, नांदेड जिल्हा व  माजी अध्यक्ष, अ. भा. नाट्यसंमेलन मा.प्रा. डॉ. दत्ता भगत यांच्या शुभहस्ते होणार आसून मा.आ. अमरनाथ राजूरकर प्रतोद, विधान परिषद मा. डी. पी. सावंत माजी पालकमंत्री, नांदेड जिल्हा मा.आ. माधवराव पाटील जवळगांवकर आमदार, हदगांव मा.आ. मोहनअण्णा हंबर्डे आमदार, नांदेड दक्षिण मा. आ. जितेश अंतापुरकर आमदार, देगलूर

मा.सौ. मंगाराणी अंबुलगेकर अध्यक्ष, जिल्हा परिषद, नांदेड मा.सौ. जयश्री पावडे महापौर, मनपा, नांदेड यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. या प्रकाशन सोहळ्यास आपण उपस्थित रहावे, अशी विनंती.संतोष पांडागळे कार्यकारी संपादक,संदिप पाटील संचालक,बालाजी जाधव सल्लागार ,शिवानंद महाजन मुख्य संपादक , मनोहर आयलाने कर सल्लागार यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *