पुरोगामी शिक्षक संघटनेच्या वतीने समृद्धी पेठकर चा सत्कार

पुरोगामी शिक्षक संघटनेच्या वतीने समृद्धीचा सत्कार .

फुलवळ ; धोंडीबा बोरगावे

बहाद्दरपुरा ता. कंधार येथील कु. समृद्धी मनोहर पेठकर या विद्यार्थिनीने सन २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या Neet या परीक्षेत ७२० पैकी ६८५ गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे , त्याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे .

     त्याच अनुषंगाने आज दिनांक ६ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने सदर संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष मनोहर धोंडीबा पेठकर व सोनिया बदनाळे ( पेठकर ) यांची कन्या कु. समृद्धी मनोहर पेठकर चा सत्कार करण्यात आला.

तिने सन २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या Neet या परीक्षेत ७२० पैकी ६८५ गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. त्याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे . तिने देशात OBC प्रवर्गातून १६० रँक प्राप्त केला आहे त्यानिमात्ताने महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने समृद्धीसह तिच्या आई , वडील , आणि आजी ‘ आजोबाचा सत्कार करून पुढील शिक्षणासाठी भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी शुभेच्छा देण्यासाठी संघटनेचे अशोक मोरे (जिल्हाध्यक्ष ) , जिल्हा सल्लागार संभाजी केंद्रे , तालुका अध्यक्ष , मोबीन शेख ‘ व्यंकट शिनगारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *