विचार विकास मंदिर वाचनालय कंधार येथे दिवाळी अंकाच्या प्रदर्शन ; प्रा.डॉ. गंगाधर तोगरे यांच्या हस्ते झाले उद्घाटन

विचार विकास मंदिर वाचनालय कंधार येथे दिवाळी अंकाच्या प्रदर्शन ; प्रा.डॉ. गंगाधर तोगरे यांच्या हस्ते झाले उद्घाटन

कंधार ;

आज दिनांक 10 नोव्हेंबर 2021रोजी विचार विकास मंदिर वाचनालय कंधार तालुका कंधार जिल्हा नांदेड येथे दिवाळी अंक 2021 प्रदर्शनाचे उद्घाटन प्राध्यापक डॉक्टर गंगाधरराव जी तोगरे यांच्या हस्ते संपन्न झाले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यिक अनीता दाणे मॅडम, पत्रकार राजेश्‍वर कांबळे ,ग्रंथपाल रफिक, वाचनालयाचे अध्यक्ष ॲड मारोती पंढरे उपस्थित होते.

यावेळी सौ.अनिता दाणे मॅडम यांनी मार्गदर्शन करताना असे सांगितले की वाचन संस्कृती टिकवून ठेवण्याचे काम विचार विकास मंदिर वाचनालय करत आहे.

अध्यक्षीय समारोप प्राध्यापक डॉक्टर गंगाधरराव जी तोगरे सर यांनी केले विचार विकास मंदिर वाचनालय हे मागील 71 वर्षापासून वाचन सेवा देत आहे , यावेळी वाचक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.

मनोज गाजरे, अनिस शेख, आली साहेब,कांबळे काका, राजू इंदुरकर. विजय बोधनकर,ग्रंथपाल जगदीश धोंड इत्यादी वाचक वर्ग उपस्थित होता या दिवाळी अंकाचे प्रदर्शन दहा तारीख दहा तारखेपासून ते 30 नोव्हेंबर पर्यंत भरवण्यात आलेले आहे .

याचा लाभ परिसरातील सर्व वाचक प्रेमींनी घ्यावा असे विचार विकास मंदिर वाचनालय कंधार वाचनालयाचे अध्यक्ष ॲड मारोती पंढरे ,ग्रंथपाल जगदीश धोंड यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *