नांदेड – भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त शहरातील मालेगाव रोड स्थित मूलगंधकुटी बुद्ध विहार तथागत नगर परिसरातील यश अकॅडमीत बालदिनाचे औचित्य साधून दुपारी बालकवी तथा विद्यार्थ्यांसाठी बालकवीसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती यश अकॅडमीचे संचालक प्रा. यशवंत भवरे यांनी दिली.
पंडित जवाहरलाल नेहरू यांचा १४ नोव्हेंबर हा जन्मदिवस देशभरात बालदिन म्हणून साजरा केला जातो. येथील सप्तरंगी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित सप्तरंगी साहित्य मंडळाच्या जिल्हा शाखेच्या वतीने पं. नेहरू यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त १४ नोव्हेंबर रोजी दुपारी १.०० वा. काव्य पौर्णिमा या कार्यक्रमास प्रारंभ होईल. बालदिनाचे औचित्य साधून सप्तरंगी साहित्य मंडळाच्या काव्य पौर्णिमा या मालेतील ४८ वी काव्य पौर्णिमा बालकवीसंमेलनाने साजरी करण्यात येणार आहे.
या कविसंमेलनात ज्येष्ठ कवी अनुरत्न वाघमारे, नागोराव डोंगरे, पांडूरंग कोकुलवार, गंगाधर ढवळे, गजानन हिंगमिरे, चंद्रकांत चव्हाण, शरदचंद्र हयातनगरकर, उषाताई ठाकूर, बालिका बरगळ, मारोती कदम, शंकर गच्चे, प्रशांत गवळे, कैलास धुतराज, बाबुराव पाईकराव, रुपाली वैद्य वागरे, रणजीत गोणारकर, गोविंद बामणे,
भीमराव ढगारे, लक्ष्मण कोंडावार, रविराज भद्रे, लक्ष्मण लिंगापुरे, गौतम कांबळे, नरेंद्र धोंगडे, विठ्ठलराव जोंधळे, दिगांबर श्रीकंठे, उल्हास काटे, राहूल जोंधळे, निवृत्ती लोणे, भैय्यासाहेब गोडबोले आदी कवी कवयित्री सहभागी होणार आहेत. परिसरातील सर्व कवी कवयित्रींनी सहभागी व्हावे असे आवाहन यश अकॅडमीच्या वतीने करण्यात आले आहे.