त्रिपुरा राज्यात मुस्लिम समाजावर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात कंधारात धरणे आंदोलन
कंधार;
त्रिपुरा राज्यात मुस्लिम समाजावर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात कंधार तहसिल कार्यालया समोर धरणे आंदोलन आज दि१२ नोव्हेबर रोजी करण्यात आले.
त्रिपुरा राज्यात मुस्लिम धर्म स्थळावर झालेल्या अत्याचारा विरोधात कंधार शहरात मुस्लिम बांधवांच्या वतीने बंद पाळण्यात आला .तसेच दुपारी नमाज आल्यानंतर तहसील कार्यालयासमोर मुस्लिम बांधवांच्या वतीने धरणे आंदोलन आज दिनांक 12 नोव्हेंबर रोजी करण्यात आले.
यावेळी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले या धरणे आंदोलनाला लोहा कंधार चे आमदार शामसुंदर शिंदे यांनी भेट देऊन आपला पाठिंबा जाहीर केला. यावेळी आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी मनोगत व्यक्त करून या घटनेचा निषेध व्यक्त केला.
धरणे आंदोलनासाठी बबर महमंद, मन्नान चौधरी , शेख हबू , चाऊस जाकेर, शेख आसेफ , महेमदपठाण पाकीजासेठ , शहरातील मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.