नायगाव : प्रतिनिधी
नायगाव स्टेट बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांच्या मुजोरीचा निष्पाप बळी गेलेल्या देगाव येथील आनंदा महाजन रोडे यांनी नायगाव बँकेच्या गेटवर फाशी घेऊन आत्महत्या केली.
दि. ०७ नोव्हेंबर २०२१ रोजी आत्महत्या झाली अजून का गुन्हा झाला नाही? बँक मॅनेजर वर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, तपास करण्यासाठी वेळ का लागत आहे? असा खडा जवाब पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे, तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक बाचावार यांना उपस्थित पदाधिकाऱ्यांना केला.
पीडित कुटूंबियांना जर न्याय मिळाला नाही तर कायदा सुविधा बिघडला तर पोलीस प्रशासन जबाबदार असेल अशा इशारा देण्यात आला.
यावेळी बँक मॅनेजर यांना फोन करून तात्काळ बोलून घेण्यात आले व बँकेचे सर्व स्टेटमेंट, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मार्फत आता पर्यंत किती लाभार्थ्यांना लाभ दिला, त्यांची यादी, मयत आनंदा रोडे यांच्याकडुन पैसे भरून घेऊन कर्ज का मंजूर केले नाही? आणि तत्कालीन नामंजूर केलेले कागदपत्रे ताबडतोब देण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी शेतकरी शेतमजूर पंचायत चे अध्यक्ष श्री. बळवंत मोरे, रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर, शिवसेना नेते डॉ. सुरेश कदम, देगाव सरपंच तथा किसान ब्रिगेड मराठवाडा अध्यक्ष डॉ. दत्ता मोरे, बळवंत पा. मोरे, चंद्रकांत पवार, देविदास जक्केवाड, बसवेश्वर गुडपे, उनकेश्वर रोडे, माधव रोडे, पीडित कुटूंब व मोठया संख्येने देगांव येथील गावकरी होते.