लोहा ; विनोद महाबळे
कोरोना विषानुणे थैमान घातल्यामुळे त्याच्या प्रादुर्भाव व ताळेबंदी मूळे पथविक्रेत्यांना उपासमारीची वेळ आली आहे म्हणून शहरातील पथविक्रेत्याना त्यांचा व्यवसाय पुन्हा उभा करण्यासाठी पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्भरनिधी सूक्ष्म पथ पुरावढा सुविधा केंद्र शशना मार्फत सुरू करण्यात आली आहे . केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी या योजनेची राज्यात प्रभावीपणे अमलबजावणी करण्याच्या हेतूने पथ विक्रेत्यांना विशेष सूक्ष्म पथपुरावढा करण्याचा निर्णय घेतला असून दहा हजार रुपया पर्यंत खेळते भांडवली खर्च उपलब्ध केले जाणार आहे .
या योजनेचा लाभ घेण्यासाठी नगर परिषदेच्या शिफारस पत्राची आवश्यकता असून त्या करीता ऑन लाईन अर्ज करावा लागणार आहे .प्रथम शिफारसपत्र ऑन लाईन प्राप्त झाल्यावरच उर्वरित सर्व ऑनलाईन अर्ज भरावे लागणार आहेत . या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील अटी आहेत. पथविक्रेत्त्याना आपला मोबाईल नं आधार क्रमकासी लिंक केलेला असणे अनिवार्य आहे . तसेच पथ विक्रेत्यांचा व्यवसाय नगर परिषद लोहा हद्दीतील असावा सदर योजना दि. 24 मार्च 2020 पूर्वी लोहा शहरामध्ये पथविक्री करत असलेल्या सर्व पत्र पथ विक्रेत्यांना लागू असेल , पथविक्रेत्यांनी नियमित परतफेड केल्यास व्याज अनुदान मिळण्यास पात्र होतील .
सदर योजनेमध्ये डिजिटल व्यवहारास प्रोत्साहन देण्यासाठी डिजिटल माध्यमातून व्यवहार करणाऱ्या पाथविक्रेत्याना कॅशबॅक सुविधा देण्यात येत आहे . नागरी पथविक्रेते एक वर्ष्याच्या परतफेड मुद्दतीसह 10,000 हजार रुपये पर्यंत कर्ज घेण्यास व त्याची दरमहा हप्त्याने परतफेड करणारे पथविक्रेते वाढीव मर्यादेसह पुढील खेळते भांडवलाच्या कर्जासाठी पात्र असतील .
ऑनलाइन अर्ज भरणे व सविस्तर माहितीसाठी http://pmsvanidhi. mohua. gov. in किंवा जवळच्या सिएसी सेंटर व clf कडून ऑनलाइन अर्ज भरू शकता अधिक माहितीसाठी दीनदयाळ अंतोदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान नगर परिषद सहायक प्रकल्प अधिकारी मंजुषा जाधव यांच्याशी संपर्क साधून योजनेचा सर्व पथविक्रेत्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन नगर अध्यक्ष गजानन सूर्यवंशी , मुख्याधिकारी मोकले, कार्यालयीन अधिकक्षक उल्हास राठोड यांनी केले आहे.