साहेब मुक्या जनावरांसाठी डॉक्टर मिळेल का डॉक्टर ?.. वर्षभरापासून फुलवळ सह परिसरातील पशुपालकांची हाक कशी पडेना कोणाच्या कानी , मुक्या जनावरसह हतबल झाले पशु धनी.


फुलवळ ;( धोंडीबा बोरगावे)


        कंधार तालुक्यातील फुलवळ येथे गेली १५ वर्षांपासून श्रेणी १ चा पशु दवाखाना कार्यरत आहे. फुलवळ अंतर्गत कंधारेवाडी , सोमासवाडी , मुंडेवाडी , जंगमवाडी , बिजेवाडी , महादेव तांडा , केवळा नाईक तांडा सह परिसरातून पशु पालक आपापली जनावरे येथे उपचारासाठी आणत असतात. परंतु येथील डॉ. उदगीरे यांची बदली होऊन एक वर्षाच्या वर कालावधी उलटला तरीपण त्यानंतर येथे कोणीही पशुवैद्यकीय अधिकाऱ्या ची नेमणूक करण्यात आली नसल्याने उपचाराआभावी जनावरांची चांगलीच फरफट होत असून पशुपालक ही पार वैतागून गेले असून शेवटी मुक्या जनावरांसाठी डॉक्टर मिळेल का डॉक्टर असेच म्हणण्याची वेळ आली आहे.

            येथील पशु दवाखान्यात तशी डॉक्टर सह इतर दोन म्हणजेच एकूण तीन पदे आहेत. त्यापैकी पशुवैद्यकीय अधिकारी यांचे पद एक वर्षा पेक्षा जास्त काळ होत आला तरीही दुसरा डॉक्टर कोणी इथे मिळेना , तर कंपाऊडर चे पद तर तीन वर्षापेक्षा जास्त काळापासून रिक्तच आहे. सध्या येथे फक्त एक पट्टीबंधक कर्मचारी कार्यरत असून जवळपास आठ , दहा गावातील जनावरांना ते एकटेच सेवा देत असून तेही प्रथमोपचार शिवाय दुसरा कसलाच विलाज येथे होत नाही. त्यामुळे अनेकवेळा पशु पालकांना उपचाराविनाच नाविलाजास्तव आपली जनावरे येथून परत न्यावी लागत आहेत. 


           या भागातील अनेक शेतकरी , पशुपालक आवडीने लाल कंधारी सह चांगल्या खाणी ची जनावरे मोठ्या आवडीने पाळत असतात. सध्या जनावरांना ही साथीची बिमारी चालू झाली असल्याने दररोज बहुतांश जनावरे येथील पशु दवाखान्यात उपचारासाठी आणली जात आहेत .

परंतु येथे पशु वैद्यकीय अधिकारी चे पदच रिक्त असल्याने आणि प्रभारी नियुक्त असलेले डॉक्टर आठवड्यातून दोनच दिवस येथे भेटीसाठी येत असल्याने जनावरांना वेळेत उपचार मिळत नाहीत आणि त्यामुळे लाखमोलाची जनावरे पाळून जर का या साथीच्या रोगात आपलं जनावर बाधित झाले तर काय करावे अशी चिंता व्यक्त करत शासन आणि प्रशासनाच्या या भोंगळ कारभाराबद्दल पशु पालकांतून संताप व्यक्त केला जात आहे. आणि मुक्या जनावरांसाठी डॉक्टर मिळेल का डॉक्टर असा सवाल केला जात आहे.

2 thoughts on “साहेब मुक्या जनावरांसाठी डॉक्टर मिळेल का डॉक्टर ?.. वर्षभरापासून फुलवळ सह परिसरातील पशुपालकांची हाक कशी पडेना कोणाच्या कानी , मुक्या जनावरसह हतबल झाले पशु धनी.

  1. Excellent & instant coverage is appreciable. All the best team Yugsakshi Live.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *