महाराष्ट्र जोशी समाज समितीच्या नांदेड जिल्हा अध्यक्षपदी दशरथ मोरे यांची बिनविरोध निवड

लोहा प्रतिनिधी

महाराष्ट्र जोशी समाज समितीच्या नांदेड जिल्हा अध्यक्ष पदी माळेगाव येथील तरुण तडफदार युवा सामाजिक कार्यकर्ते दशरथ मोरे यांची नुकतीच बिनविरोध निवड होऊन माळेगाव येथील एका भव्य कार्यक्रमात नवनियुक्त जिल्हाध्यक्ष दशरथ मोरे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले .

यावेळी या कार्यक्रमास महाराष्ट्र जोशी समाज समितीचे प्रदेशाध्यक्ष काकासाहेब चौगुले, माळाकोळी सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील, माळेगाव चे सरपंच हनुमंत धुळगंडे, मराठवाडा उपाध्यक्ष बी .एल. भोसले, परभणीचे रामेश्वर भोळे, उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष पोपटराव भोसले, लातूर युवक अध्यक्ष भागवत गरड प्रमुख उपस्थित होते .

यावेळी कार्यक्रमात नवनियुक्त पदाधिकारी म्हणून बी.एल. भोसले मराठवाडा उपाध्यक्ष, दशरथ मोरे नांदेड जिल्हाध्यक्ष, राजू मोरे शाखाध्यक्ष, माधव वायफळ कर, लक्ष्मण भोळे, बालाजी हरगावकर, संतोष वायफळकर, केशव मोरे, परमेश्वर मोरे यांची नांदेड सहसंपर्क पदी नेमणूक करून प्रदेशाध्यक्ष काकासाहेब चौगुले, जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पा

माळेगाव चे सरपंच हनुमंत पाटील धुळगंडे व मान्यवरांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

यावेळी माळाकोळी सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील बोलताना म्हणाले की दशरथ मोरे या सामाजिक जाण असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या ची जोशी समाज समितीने नांदेड जिल्हा अध्यक्ष म्हणून नेमणूक करून खऱ्या समाजसेवा करणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांला जोशी समाज समितीने न्याय दिला असून, नूतन जिल्हाध्यक्ष दशरथ मोरे आपल्या सामाजिक कार्याच्या जोरावर जोशी समाज प्रदेश समितीचा नक्कीच विश्वास संपादन करतील असा विश्वास यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील यांनी व्यक्त केला,

यावेळी माळेगाव येथील जोशी समाजाचे तरुण कार्यकर्ते ,महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. जोशी समाज समितीचे नवनियुक्त नांदेड जिल्हाध्यक्ष म्हणून दशरथ मोरे यांची निवड झाल्याने लोहा, नांदेड, माळेगाव, भोकर, अर्धापूर येथे दशरथ मोरे यांच्या शेकडो समर्थकांनी जल्लोष करून नवनियुक्त जिल्हाध्यक्ष दशरथ मोरे यांना शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *