लोहा: प्रतिनिधी
दि.१४नोव्हेंबर२०२१रोजी विधी सेवा समिती लोह्याच्या वतीने, लोहा न्यायालय ते पोलीस स्टेशन पर्यंत रँली काढून समारोप करण्यात आला.,भारत का आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत लोहा तालुका विधी सेवा सप्ताह या उपक्रमाची, विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा लोहा न्यायालयाचे न्यायमूर्ती पी.बी.तौर यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात व आनंदात सांगता झाली.
सदरील कार्यक्रमात सत्कार समारंभानंतर, प्रास्ताविकात अभिवक्ता संघाचे अँड.भिमराव गोरे,यांनी विधी सेवा सप्ताह लोहा यांनी महिनाभरात गावोगावी राबविण्यात आलेली विविध कायदेविषयक शिबिरे संदर्भात माहिती दिली.
अध्यक्षीय भाषणात बोलताना न्यायमूर्ती पी.बी.तौर यांनी, भारत काआझादी का अमृत महोत्सव अंतर्गत सदरील उपक्रम हा,(१२मार्च २०२१ते १५आँगस्ट २०२३)पर्यंत ७५आठवड्यांचा असून आपण स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण करून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणार आहोत,तसेच विधी सेवा समिती स्थापनेस २५वर्षे पुर्ण होत आहेत.
या ७५वर्षात स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काय कमावले व काय कमावले याचे मंथन करण्याची आवश्यकता आहे.समाजातील सर्वात शेवटच्या दुर्लब घटकांना सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक उत्थानासाठी कायद्याच्या माध्यमातून सर्व सेवा,अधिकार संबधित शासनाच्या वतीने मिळवून देण्यासाठी आपल्याला मदत केली पाहिजे.सर्वांनी शिक्षण घेऊन कायदा हातात न घेता, तो समजून घ्यायला हवा.
कायद्याचे बाळकडू बालकांना घरातूनच शिस्त घालून देण्याची जबाबदारी पालकांची आहे,कारण शिस्त हेच सुखाचे साधन आहे. शिक्षणाचे महत्त्व सांगताना, ज्ञानी व्हा!,ज्ञानीवंत व्हा!ज्ञानाअभावी व्यक्तीचे आचरण हे पशुसमान आहे., शिक्षण असत्याकडून-सत्याकडे, अंधकारातून-प्रकाशाकडे नेते शिक्षणामुळे व्यक्ती कायदा समजतो,इतरांना समजावून सांगतो परिणामी शिक्षीत व्यक्तीच्या हातून गुन्हा घडण्याचे प्रकार क्वचितच दिसून येतात, त्यामुळे प्रत्येक शिक्षित व्यक्तीने अशिक्षित लोकांना कायद्याचे महत्त्व समजावून सांगून त्यांना गुन्हेगारी मानसिकतेतून बाहेर काढले पाहिजे ही सर्वांची सामाजिक जबाबदारी आहे, असेही आपल्या मनोगतात सांगितले.
सदरील समारोप कार्यक्रमात,पोलीस निरीक्षक संतोष तांबे, जेष्ठ वकील अँड. डी.पी.बाबर,अँड.एस.टी.गरूडकर,अँड.डी.आर.गायकवाड,अँड.पी.यू.कुलकर्णी,गटविकास अधिकारी शैलेश व्हावळे ,गटशिक्षणाधिकारी रविंद्र सोनटक्के,आदींनी आपल्या भाषणातून कायद्या विषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.,तसेच न्यायालयाच्या पाच टीमच्या माध्यमातून गावोगावी कायदेविषयक शिबिरे घेण्यात आली.
यावेळी लोहा न्यायालयाचे कार्यालयीन अधिक्षक श्री.एस.एम. मोरे, विधी सेवा समिती कर्मचारी श्री. वसंत वडजे, लोहा विधी सेवा समिती स्वंयसेवक श्री. ज्ञानोबा पवार, श्री.राजीव तिडके, श्री. भिमराव जोंधळे, श्री. मंगल सोनकांबळे यांची प्रामुख्याने उपस्थित होती.
याप्रसंगी,श्री. संत गाडगेमहाराज काँलेजचे एन.सी.सी.कँडेट, लोहा अभिवक्ता संघाचे सदस्य, न्यायालयीन कर्मचारी, पोलीस कर्मचारी, तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील, सरपंच,नागरिक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वैजनाथ पांचाळ यांनी केले तर आभार मारोती पंढरे यांनी मानले.