बामणी फाटा ते बाचोटी रस्तासाठी तहसील कार्यालयावर गावकऱ्यांचा र्मोर्चा

कंधार

कंधार तालुक्यातील बामणी फाटा ते बामणी व बामणी ते बाचोटी तांडा या ५ किमी अंतराच्या रस्त्या साठी आज सोमवार दि.१५ नोव्हेबर रोजी
तहसिल कार्यालयावर गावकऱ्यानी मार्चा काढला शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यास अभिवादन करून अमरण उपोषण तहसिल समोर सुरु केले आहे.
.

तहसीलदार कंधार यांना यापूर्वी या रस्त्यात संदर्भात निवेदन देऊन तात्काळ रस्ता करावा अशी मागणी करण्यात आली होती परंतु या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले असल्याने आज गावकऱ्यांनी सदरील रस्त्यासाठी उपोषण पुकारले आहे

जो पर्यंत बामणी फाटा ते बामणी व बामणी ते बाचोटी तांडा या रस्त्याची मागणी मान्य होणार नाही. तो पर्यंत
उपोषण चालू राहील असे सरपंच व गावकऱ्यांनी सांगितले. या निवेदनावर सरपंच सविता वाघमारे, सदस्या प्रतिमा शिनगारपुतळे, सदाशिव कदम, शंकर कदम विनायक शिनगारपुतळे आदिच्या स्वाक्षरी आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *