कंधार; प्रतिनिधी
तहसील कार्यालय कंधार समोर दिव्यांग बांधव ,विधवा महिला व वृद्ध लाभार्थ्यांच्या करिता दि१५ नोव्हेबर रोजी आंदोलन करण्यात आले .
दिव्यांग प्रहार शक्तीचे शेख दस्तीर छोटूमिया यांच्या कंधार येथे संपन्न झालेल्या आंदोलनाला कंधार चे तहसीलदार संतोष कामठेकर यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान तहसीलदार संतोष कामठेकर यांनी दिव्यांग बांधवांच्या तहसील लेव्हलच्या पूर्ण मागण्या ते व्यक्तिश पूर्ण करतील.अशा प्रकारचे लेखी आश्वासन देण्यात आले.
तसेच पंचायत समिती व नगरपालिका यांना त्यांच्या लेव्हलच्या मागण्यासंदर्भात तहसीलदार स्वतः आदेशित करतील असे आश्वासन दिले .
या ठिय्या आंदोलनात बहादरपुरा नगरीचे युवा नेते सचिन तानाजी पाटील पेटकर , बालाजी चुकलवाड , शंकर खरात , कंधार तालुक्यातील सर्व दिव्यांग , विधवा महिला व तसेच वयोवृद्ध मंडळी उपस्थित होते.