लोहा ; प्रतिनिधी
बहुजन भारत पार्टीच्या लोहा तालुका बैठकीमध्ये
बैठकीचे अध्यक्ष तालुक्याचे प्रभारी जिल्ह्याचे महासचिव केशव कंदारे यांनी भूषविले तर बैठकीची प्रमुख पाहुणे बालाजी गजले राष्ट्रीय कोषाध्यक्ष तेलंगणा राज्याचे प्रभारी हे उपस्थित होते.
मा. गारे एस एम प्रदेश सचिव जिल्हा प्रभारी नांदेड यांनी मार्गदर्शक म्हणून या बैठकीला पार्टीच्या वाढ आणि विकासासाठी मार्गदर्शन केले.
बहुजन भारत पार्टी तालुका प्रभारी जिल्हा महासचिव तसेच जिल्हा प्रेस कॉन्फरन्स प्रमुख म्हणून केशव कंदारे यांची नियुक्ती करण्यात आली.
विलास खंदारे तालुका सचिव म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली तसेच बालाजी खंदारे यांची सावरगाव जिल्हा परिषद गट अध्यक्ष म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली.
बैठकीमध्ये बहुजन भारत पार्टी सभासद नोंदणी पुस्तिकेचे वाटप करण्यात आले.
येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये कंधार तालुक्यातील बहुजन भारत पार्टी कार्यकारणी सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समिती चे उमेदवार निवडणूक लढविणार यासाठी पक्ष कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असा संदेश गारे एस. एम. यांनी दिला.